Hashtagintro

Prahaar Movie Box Office Collection : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ने फक्त 19 कोटीतच बॉक्स ऑफिसवरून गुडांळला गाशा, तर आदिनाथ कोठारेच्या ‘नयी नवेली’ने कमावले…

Prahaar Movie Box Office Collection : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ने फक्त 19 कोटीतच बॉक्स ऑफिसवरून गुडांळला गाशा, तर आदिनाथ कोठारेच्या ‘नयी नवेली’ने कमावले…

बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची स्पर्धा सुरू असली की कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली, याकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. जर मराठी कलाकार त्या हिंदी सिनेमात असतील तर ही उत्सुकता आणखी ताणली जाते. सध्या ललित प्रभाकर याचा ‘प्रहार’ तर आदिनाथ कोठारेचा नयी नवेली हा सिनेमा चर्चेत होता. परंतु आता या सिनेमांनी त्यांच्या बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे चित्रपटगृहातील आपला गाशा गुंडाळेला आहे.

पिंकव्हिलाच्या ट्रेड अंदाजानुसार, ललित प्रभाकरच्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा जवळपास 19.50 कोटींची कमाई करून आपला थिएटरमधील प्रवास संपवण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 13 कोटींची कमाई केली होती. मात्र दुसर्‍या आठवड्यात कमाईत मोठी घसरण झाली. या आठवड्यात चित्रपटाने 4.50 कोटी रूपये कमावले. तिसऱ्या आठवड्यात आणखी साधारण 2 कोटी रूपयांची कमाई करण्याचा अंदाज आहे. त्या अंदाजानुसार या चित्रपटाची कमाई 19.50 किंवा त्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे आदिनाथ कोठारेच्या ‘नयी नवेली’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने तुलनेने चांगली सुरूवात केली होती. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 20.50 कोटी रूपयांची कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात तब्बल 85 टक्क्यांनी घट झाली आणि चित्रपटाने केवळ 2.75 कोटी रूपये कमावले. दोन आठवड्यातील एकूण कमाई 23.25 कोटी रूपये झाली. अंतिम कमाई जवळपास 24 कोटी रूपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत आदिनाथच्या नयी नवेली याने ललितच्या प्रहार पेक्षा जवळपास 4.50 कोटी रूपये अधिक कमावले. प्रहारचं दिग्दर्शन अविनाश अरूण यांनी केलं असून, यात ललित प्रभाकर, राजकुमार राव, वामिका गब्बी,जयदीप अहलावत यांच्या मुख्य आणि महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या खटल्यांपैकी 26/11 च्या खटल्यावर आधारित होता.

तर नयी नवेली चं दिग्दर्शन बालाजी मोहन यांनी केलं आहे. यामी गौतमसोबत आदिनाथ कोठारे,मीता वशिष्ठ आणि सुनीता राजवर यांसारखे कलाकार या चित्रपटात आहेत. मेरठमधील एका कुटुंबात येणाऱ्या नव्या सुनेभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language