Hashtagintro

Priyanka Chopra : वाढदिवसानिमित्त प्रियांका चोप्राची परिणीतीसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली..

Priyanka Chopra : वाढदिवसानिमित्त प्रियांका चोप्राची परिणीतीसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली..

Priyanka Birthday Wish For Parineeti Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अपकमिंग ‘वाराणसी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचं कुटुंबावर किती प्रेम आहे, हे तर सर्वांनाचा माहीत आहे. नुकताचा तिने लेक आणि पतीसोबतचा फोटो शेअर केला होता. तर आता तिने तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात.प्रियांकाची बहीण परिणिती चोप्राचा आज, 22 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. या खास प्रसंगी प्रियांकाने तिच्या बहीणीवार प्रेमाचा वर्षाव केला आहे.

परिणिती आणि प्रियांका या चुलत बहिणी आहेत, पण दोघींमध्ये सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम आहे. दोघी बऱ्याचदा सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकींवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. मग तो वाढदिवस असो, एखादा सण किंवा आअजून काही खास प्रसंग. आता प्रियांकाने तिच्या लाड्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच तिचा फोटोही शेअर केलाय.

प्रियाकांची परिणितीसाठी खास विश

प्रियंका चोपड़ाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर परिणीती चोप्राचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणिती खूप गोड दिसत आहे. तिने पिंक रंगाचा ड्रेस घातली असून, मोकळ्या केसांसह आपला लूक पूर्ण केला आहे. हा फोटो शेअर करताना प्रियंकाने छान विश लिहीली. हॅप्पी बर्थडे तीशा…तुझं हे वर्ष प्रेम, हसू आणि आनंदाने भरलेलं असो..असं तिने लिहीलं.

प्रियंका चोपड़ा लवकरच ‘वाराणसी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. अलीकडेच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लुकही बाहेर आला होता, ज्यात ती खूप गोड दिसत होती. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारनही दिसणार आहेत. या चित्रपटांचं दिग्दर्शन एसएस राजामौली दिग्दर्शित करत आहेत, ज्यामुळे चाहत्यांना चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी, म्हणजे वर्षी म्हणजे 2027 मध्ये 7 एप्रिलला प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून रिपोर्टनुसार, त्याचं बजेट सुमारे 1,400 कोटी रुपये आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language