Hashtagintro

Pudhari Property Expo | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्सपो’ची उत्स्फूर्त प्रतिसादात सांगता

कोल्हापूर : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो – २०२६’ची रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. या भव्य प्रदर्शनात नामांकित बिल्डर्स आणि प्रॉपर्टी व्यावसायिकांच्या विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरले.

रामसीना ग्रुप प्रस्तुत ‘पुढारी प्रॉपर्टी एक्सपो- २०२६’चे मुख्य प्रायोजक ‘अनंत इस्टेट डेव्हलपर्स’ व सहप्रायोजक ‘रायसन्स ग्रुप’ होते. हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांसाठी मार्गदर्शक आणि त्यांच्या वेळ-श्रम-पैशाची बचत करणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

सणांच्या शुभमुहूर्तावर हक्काच्या घराची मुहूर्तमेढ रोवण्याच्या उद्देशाने अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत विविध गृहप्रकल्पांची माहिती घेतली. आपल्या बजेटनुसार घराची निवड करण्याबरोबरच प्रकल्पांची वैशिष्ट्ये, उपलब्ध सुविधा आणि आकर्षक ऑफर्स जाणून घेण्यावर ग्राहकांचा भर होता. घर खरेदीसाठी योग्य पर्याय शोधणाऱ्या कुटुंबांसह प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

एकाच छताखाली गृहप्रकल्पांची माहिती

सध्याच्या काळात घर खरेदी करताना ग्राहकांना अनेक पर्यायांची तुलना करून योग्य निर्णय घेता यावा, या उद्देशाने ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहक आणि बिल्डर्स यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. विविध गृहप्रकल्पांची माहिती, घर खरेदीसाठी उपलब्ध पर्याय आणि ऑफर्स यांची माहिती मिळाल्याने ग्राहकांना निर्णय घेण्यासाठी मदत झाली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language