Hashtagintro

Pune Murder Case | आयटी अभियंता तरुणीचा पुण्यात खून; मारहाण, भिंतीवर आपटले

पिंपरी : प्रेमसंबंधातील वादातून आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराने निर्घृण खून केला. तरुणीला भिंतीवर आणि बेडवर आपटून तिच्या चेहऱ्यावर बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २३) पहाटे तीनच्या सुमारास हिंजवडीतील साखरे वस्ती येथील प्रिस्टाईन पीजीमध्ये घडली. कोमल राजेंद्र डहाके (२७, मूळ रा. वर्धा) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर शुभम ज्ञानेश्वर कालबांडे (रा. शेणगाव, हिंगोली) याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि शुभम यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. तोही एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून ते प्रेमसंबंधात होते. मात्र, शुभमचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा कोमलला संशय होता. रविवारी रात्री दोघेही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यानंतर ते कोमल राहात असलेल्या साखरे वस्तीतील पीजीमध्ये आले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादातून संतापलेल्या शुभमने कोमलला भिंतीवर आणि बेडवर आपटले. तिच्या चेहऱ्यावर हाताने बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language