Hashtagintro

Radhika Apte : ‘तर केवळ विनाशच…’, देवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राधिका आपटे स्पष्टच म्हणाली…

Radhika Apte : ‘तर केवळ विनाशच…’, देवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राधिका आपटे स्पष्टच म्हणाली…

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे हिच्या अभिनयाचं कायम कौतुक होतं असतं. पण गेल्या काही दिवसांपासून राधिका तिच्या स्पष्ट आणि परखड मतांमुळे चर्चेत आली आहे. गोऱ्या रंगाच्या अभिनेत्रींबद्दल मोठं वक्तव्य केल्यानंतर राधिका ‘मी देवावर विश्वास ठेवत नाही…’, असं स्पष्टच म्हणाली आहे. अशात देवावर आणि देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राधिका हिने मोठं वक्तव्य केलं. वक्तव्यामुळे राधिका हिने नवा वाद स्वतःवर ओढवून घेतला आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. तर जाणून घ्या राधिका असं नेमकं म्हणाली तरी काय?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राधिका म्हणाली, “माझा देवावर विश्वास नाही. माझा असा विश्वास आहे की निसर्ग हाच देव आहे आणि माझी इच्छा आहे की लोकांनी निसर्गाची पूजा करावी. शक्तीमध्ये अफाट सौंदर्य आहे, पण त्याच शक्तीचा तुम्ही छळ केला, त्या शक्तीचा गैरवापर केला, तर केवळ विनाशच होतो.”, सध्या अभिनेत्रीचं असं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.

यापूर्वी राधिका हिने गोऱ्या अभिनेत्रींबद्दल मोठं वक्तव्य केलेलं. राधिका म्हणालेली, ‘कदाचित मी चुकीची देखील असू शकते. पण मला असं वाटतं की, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नॉर्थ इंडियन अभिनेत्रींना कास्ट केलं जातं, कारण त्या गोऱ्या असतात. माझा रंग गोरा नाही, त्यामुळे मी विचार करते, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रींना का घेतलं जात नाही आणि त्यांच्या जागी नॉर्थ इंडियन अभिनेत्रींना कास्ट केलं जातं. एवढंच नाही तर, परदेशी कलाकारांना देखील संधी दिली जाते… आपल्याकडे असं कायम होतं…’, असं देखील राधिका आपटे म्हणाली.

राधिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आक्का’ सीरिजमुळे चर्चेत आली आहे. राधिका हिने मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. एवढंच नाही, ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

नेटफ्लिक्सवर ‘अक्का’ सीरिज 30 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. सीरिजची कथा क्राईम थ्रिलर भोवती फिरताना दिसणार आहे. तर सीरिजमध्ये राधिका हिने किर्ती सुरेश ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र राधिकाच्या सीरिजची चर्चा रंगताना दिसत आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language