Hashtagintro

Raigad News: पोलादपूरमधील बोरज गावात घराला अचानक आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Raigad Poladpur House Fire

पोलादपूर : समीर बुटाला

पोलादपूर तालुक्यातील बोरज गावात एका घराला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरज गावातील रहिवासी अशोक चंदू झाडाणे यांच्या घराला अचानक आग लागली. अशोक झाडाणे हे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईतील दिवा येथे वास्तव्यास असल्याने घटनेच्या वेळी त्यांच्या घरात कोणीही उपस्थित नव्हते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सभापती चंद्रकांत कळंबे यांच्यासह पोलीस व शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

गावातील घराला अचानक आग लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे नेमके कारण काय, तसेच घरातील मालमत्तेचे किती नुकसान झाले आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अशोक झाडाणे हे नोकरीनिमित्त मुंबईत राहत असल्याने गावी असलेल्या त्यांच्या घराचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर संकट ओढवले आहे. या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. आगीचे कारण आणि नुकसानीचा अधिकृत तपशील पंचनाम्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language