सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरूणांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वे भरती मंडळाने एनपीटी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे भारतीय रेल्वेमध्ये 3,548 पदे भरली जाणार आहेत.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
कोणत्या पदांसाठी भरती होणार : या भरती अंतर्गत चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे. 1)तिकीट पर्यवेक्षक – 127 पदे 2) गुड्स मॅनेजर – 2750 पदे 3) कनिष्ठ लेख सहाय्यक तथा टंकलेखक – 300 पदे 4) वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक – 371 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : रेल्वे NTPC पदवीधर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
शैक्षणिक पात्रता काय असावी? : या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा, आरक्षणानुसार सवलती आणि प्रत्येक पदासाठी लागू असलेल्या अटी यांची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल? :उमेदवारांची निवड कॉम्यूटराईझ पद्धतीने केली जाईल. यामध्ये पहिली परीक्षा (CBT-1 ), तर दुसरी परीक्षा ( CBT – 2 ) याद्वारे केली जाईल. कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल. तसेच पदानुसार निवड प्रक्रियेत बदल असू शकतात.
Source: TV9 Marathi Education





