Hashtagintro

Raju Shetty | शासन नियुक्त संचालक अध्यक्ष निवडीसाठी आत जातील, पण येताना खांद्यावरून येतील

कोल्हापूर : राज्य शासनाने गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक नेमले आहेत, पण ते उद्याच्या सभेला आत जातील, त्यांच्या पायाने. परत येताना मात्र, ते खांद्यावरून येतील, असा इशारा देत, मंगळवारी गोकुळला घेराव घाला, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. गोकुळची निवडणूक ज्या कायद्याने झाली, त्यात अशी कोणतीही तरतूद नसताना, नवा कायदा केलाच का? यावरून काहीही झाले, काहीही करावे लागले, कोणत्याही थराला जावे लागले तरी सत्ता मिळालीच पाहिजे, हाच तुमचा उद्देश आहे, हे दिसून येते.

‘कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. येथे अन्याय सहन केला जात नाही. गोकुळमुळे अमूल दूध संघाला येथे पाय पसरता आले नाहीत. यामुळेच सरकारला तज्ज्ञ संचालकांच्या माध्यमातून गोकुळ ताब्यात घेऊन ते अमूलच्या घशात घालायचे आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे गुजरातचे व्हाईस रॉय म्हणून काम करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. उद्या मंगळवारी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होत आहे. ज्यांना गाय आणि म्हैस यामधील फरक कळत नाही, असेही काहीजणांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. आता हे संचालक उद्या आपल्या पायाने आत जातील, पण येताना ते आपल्या पायावर नाही तर खांद्यावरून बाहेर येतील. यासाठी सर्वांनी उद्या गोकुळला घेराव घाला, असे आवाहनही त्यांनी केले.

भव्य मंडप, प्रचंड गर्दी

मोर्चाचे सभेत रूपातंर झाले. तेथे मंडपाची सोय करण्‍यात आली होती, पण प्रचंड गर्दी झाल्याने तेथे जागा अपुरी पडली. अनेक जणांनी जवळपासच्या झाडावर आणि महावीर गार्डनच्या संरक्षण भिंतीवर बसून नेत्यांची भाषणे ऐकली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language