Hashtagintro

Ramayana : ‘या’ 5 मार्गांनी वसूल होणार आदिनाथ कोठारे फेम ‘रामायण’चे 4000 कोटी! मोठा खुलासा

Ramayana : ‘या’ 5 मार्गांनी वसूल होणार आदिनाथ कोठारे फेम ‘रामायण’चे 4000 कोटी! मोठा खुलासा

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे, यश आणि अभिनेत्री साई पल्लवी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रामायण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमा पाच दिवसांत मोठा टप्पा पार केला असून, दोन भागात सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि त्याचं 4000 कोटी रुपये बजेट आहे. सांगायचं झालं तर, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘रामायण’ हा सिनेमाला चांगले रिव्ह्यूज मिळत आहेत. इंटरनेटवर सिनेमातील व्हीएफएक्सचं कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. पण सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा हे सिनेमाच्या कमाईसाठी केवळ बॉक्स ऑफिसवर अवलंबून नाहीत; सिनेमाच्या कमाईसाठी त्यांच्याकडे इतरही अनेक मार्ग आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत निर्माते नमित मल्होत्रा म्हणाले, “मी ‘आपण किती पैसे कमावले किंवा कमावले नाहीत’ या विचाराने काम करत नाही. जर आपण सिनेमांमधून पैसे कमावू शकलो नाही, तर मर्चेंडाइजमधून कमावू. मर्चेंडाइजमधून कमावता आले नाही तर थीम पार्कच्या माध्यमातून कमाई करू. तिथेही कमाई झाली नाही, तर आम्ही दुसरा मार्ग शोधू.”

हैदराबादमधील सिनेमाच्या तेलगू प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान नमित मल्होत्रा यांनी सांगितले होते की, ते केवळ दोन सिनेमाच बनवणार नाहीत, तर असा प्रकल्प तयार करणार आहेत ज्याच्याशी प्रेक्षक दीर्घकाळ जोडले जाऊ शकतील. ते म्हणाले की, “रामायण हा फक्त एक शब्द नसून एक दर्शन आहे. माझा उद्देश केवळ सिनेमा बनवणं हा कधीच नव्हता, तर यापेक्षा काहीतरी भव्य तयार करणं हा होता.” नमित मल्होत्रा यांनी पुढे स्पष्ट केलं, “आमचा उद्देश एक किंवा दोन सिनेमे बनवून भगवान रामांचा प्रवास संपवणं हा नसून, याद्वारे रामायणाशी संबंधित आणखी सिनेमे बनवणं हा आहे.”

‘रामायण’ सिनेमाची आतापर्यंतची कमाई…

‘रामायण’ सिनेमाने अवघ्या 6 दिवसांत जगभरात 800 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सिनेमाची ज्या वेगाने कमाई सुरू आहे, ते पाहता हा सिनेमा लवकरच स्वतःचं बजेट वसूल करेल असं दिसत आहे. तर दुसरीकडे निर्माते नमित मल्होत्रा यांची भूमिका मात्र वेगळी आहे; त्यांच्या मते, जर बॉक्स ऑफिसवरून कमाई झाली नाही, तर ते इतर मार्गांनी सिनेमाची वसुली करू शकतात.

सिनेमातील कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर कपूर याने सिनेमा प्रभू राम यांची भूमिका साकारली आहे, तर यश रावणाच्या भूमिकेत आहे. साई पल्लवी हिने माता सिता यांच्या भूमिकेला न्याय दिला असून अभिनेता आदिनाथ कोठारे याने भरत ही भूमिका साकारली आहे. यांच्यासोबतच सिनेमात रवी दुबे लक्ष्मण, अरुण गोविल राजा दशरथ, इंदिरा कृष्णन कौशल्या, लारा दत्ता कैकेयी, शीबा चड्ढा मंथरा, रकुल प्रीत सिंह शूर्पणखा आणि काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेत दिसत आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language