Hashtagintro

Ramayana :’रामायण’मध्ये राजा दशरथ यांची भूमिका साकारण्यासाठी अरूण गोविल यांनी केलेली टाळाटाळ, म्हणाले…

Ramayana :’रामायण’मध्ये राजा दशरथ यांची भूमिका साकारण्यासाठी अरूण गोविल यांनी केलेली टाळाटाळ, म्हणाले…

रामायण म्हटलं की आजही अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर सर्वात आधी अरूण गोविल यांचा श्रीरामाच्या स्वरूपातील चेहरा येतो. 1987 मध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेली श्रीरामांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता हेच अरूण गोविल नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात श्रीरामांचे वडील दशरथ यांच्या भूमिकेत दिसत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? सुरूवातीला ही भूमिका साकारण्यासाठी अरूण गोविल यांनी तब्बल 3 महिने घेतले होते? सुरूवातीला तर त्यांनी या भूमिकेसाठी स्पष्ट नकारही दिला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरूण गोविल यांनी याबाबत खुलासा केला. त्यांना जेव्हा पहिल्यांदा राजा दशरथ यांच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली तेव्हा त्यांना ती स्वीकारण्याची फारशी इच्छा नव्हती. खरं तर त्यांना ही भूमिका करण्याची गरजच वाटत नव्हती. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी या भूमिकेसाठी त्यांना घेण्यावर ठाम होते. त्यांनी वारंवार आग्रह केला. अखेर जवळपास 3 महिन्यानंतर अरूण गोविल यांनी या भूमिकेसाठी होकार दिला.

मुलाखतीत त्यांनी एक मजेशीर गोष्टही सांगितली. रणबीर कपूर आणि यश यांना या चित्रपटासाठी तयार करणं सोपं होतं. पण राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड करणं खूप कठीण होतं. अखेर नितेश तिवारी यांच्या आग्रहपुढे अरूण गोविल यांनी होकार दिला असे व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान अरूण गोविल यांनी याबद्दल माहिती दिली.

अरूण गोविल पुढे म्हणाले की, राजा दशरथांची भूमिका समजून घेणं त्यांच्यासाठी फारसं कठीण नव्हतं. कारण रामानंद सागर यांच्या मालिकेत श्रीराम साकारताना त्यांच्या मनात दशरथ या पात्राची समज तयार झाली होती. श्रीरामांच्या भावना समजून घेताना दशरथांच्या भावना त्यांना नेहमीच जाणवत होत्या. शिवाय वास्तविक आयुष्याही ते 46 वर्षांच्या मुलाचे वडील असल्यामुळे पित्याच्या भावना समजून घेणं त्यांना सहज शक्य झालं.असं अरूण गोविल यांनी सांगितलं.

दशरथ हे केवळ रामाचे वडील नसून अयोध्येचे राजे आहेत. त्यामुळे मुलाला वनवासात पाठवताना मनातून दु:खी असूनही त्यांना राजाचा संयम आणि प्रतिष्ठा ठेवावी लागते. ही व्यक्तिरेखा साकारताना तिच्या संवेदनशीलतेला प्रेक्षकांनी समजून घेतल्याचं पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचंही अरूण गोविल यांनी सांगितलं.

एकेकाळी छोट्या पडद्यावर श्रीराम म्हणून घराघरांत पोहोचलेले अरूण गोविल आता त्याच रामायणाच्या कथेत राजा दशरथ बनून प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language