Hashtagintro

Ramayana Movie: रामायणातून माझा रोलच कट… प्रसिद्ध अभिनेत्याचा गंभीर आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Ramayana Movie: रामायणातून माझा रोलच कट… प्रसिद्ध अभिनेत्याचा गंभीर आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Ramayana Part 1: नितेश तिवारी यांचा ‘रामायण: पार्ट वन’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मुख्य कलाकारांना सर्वत्र प्रशंसा मिळत आहे. सहाय्यक पात्रांची निवडही उत्कृष्ट असल्याचे दिसते. रामायणात एक पात्र असे होते, ज्याचे चित्रीकरण झाले होते, पण सिनेमातून त्या पात्राचे पैसे कट केले गेले. ते पात्र होते सुमंत्र, जे राजा दशरथाच्या आठ राजनैतिक मंत्र्यांपैकी एक होते. त्यांनीच प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांना वनवासानंतर आपल्या रथातून अयोध्येपासून गंगेच्या काठापर्यंत पोहोचवले होते.

नमित मल्होत्रा ​​यांच्या ‘रामायण’मध्ये सत्येन चतुर्वेदी यांनी सुमंत्राची भूमिका साकारली होती. मात्र, सिनेमातून त्यांचे सीन कट करण्यात आले आहेत. या अभिनेत्याने खुलासा केला की, “रामायण या चित्रपटातून माझे सीन कट केले गेले आहे. या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार. एखादा अभिनेता चित्रित करत असलेली सर्वच सीन सिनेमातून काढून टाकणे हे आमच्या कलाकारांचे आयुष्य आहे.”

 

रामायण चित्रपटाचे बजेट हे तब्बल ४००० कोटी आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये एवढी क्रेझ आहे कारण VFX, एनिमेशनमुळे सगळं पडद्यावर भव्य पाहायला मिळाले. रामायण चित्रपटाचे एकूण तीन भाग येणार आहेत. सध्या तर भाग १ सर्वत्र प्रदर्शित झाला असून त्याची सगळीकडे चर्चा होता आहे. अनेक कलाकारांनी चित्रपट पाहिला आहे आणि त्यांनी भरभरुन कौैतुकही केले आहे.

 

या चित्रपटात साई पल्ल्वीने माता सीताची भूमिका केली आहे. रवी दुबेने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. काजल अग्रवालने मंदोदरीची भूमिका साकारली आहे. लारा दत्ताने कैकयीची भूमिका साकारली आहे. राजा दशरथची भूमिका ही अरुण गोवीलने साकारली आहे. रकुल प्रीत सिंगने शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. रामायण चित्रपटाच्या शेवटी अभिनेता राघव जुयलची झलक पाहायला मिळाली. राघव हा रावणाचा मुलगा मेघनाथची भूमिका साकारली आहे. भाग १ मध्ये जरी त्याची भूमिका जास्त नसली तरीही भाग दोनमध्ये त्याची भूमिका मोठी असेल.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language