Hashtagintro

Rashami Desai : रश्मी देसाईला घटस्फोट, आता 11 वर्ष लहान मुलीसोबत अभिनेत्याची नवी सुरुवात, दोघांचा रोमँटिक Video समोर

Rashami Desai : रश्मी देसाईला घटस्फोट, आता 11 वर्ष लहान मुलीसोबत अभिनेत्याची नवी सुरुवात, दोघांचा रोमँटिक Video समोर

Rashami Desai : सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता अभिनेत्री रश्मी देसाई हिच्या पूर्व पतीच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एक काळ असा होता जेव्हा रश्मी आणि अभिनेता नंदिश सिंग संधू चाहत्यांना कपल गोल्स द्यायचे. दोघांनी मोठ्या थाटात लग्न देखील केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर रश्मी आणि नंदिश यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत अधिकृत घटस्फोटाची घोषणा केली. आता नंदिश याने 11 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत दुसरा संसार थाटला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नंदिश याच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

नंदिश याने अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड कविता बॅनर्जी हिच्यासोबत 14 नोव्हेंबर रोजी लग्न केल्याचं कळत आहे. दोघांच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दोघांनी संगीत सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्यासोबत त्याचे कुटुंबिय प्रचंड आनंदी दिसत आहेत. कविता आणि नंदिश देखील नव्या आयुष्याची सुरुवात करणार म्हणून आनंदी दिसत आहे… दोघांचा रोमँटिक अंदाज तर सर्वांना आवडला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by NANDISH SINGH SANDHU (@nandishsandhu)

 

संगीत सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत नंदिश म्हणतो, ‘लग्नाच्या आधी मला सर्वांचं आभार मानायचे आहे. ज्यांनी मला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद दिले आहे. एक रात्र, असंख्य आठवणी, आनंद आणि थोडा डान्स… सर्व खास लोकांचं एकाच छता खाली असणं खास आहे…’, सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रश्मी देसाई हिच्यासोबत पहिलं लग्न…

सांगायचं झालं तर, हे नंदिश याचं दुसरं लग्न आहे. अभिनेत्याचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री रश्मि देसाई हिच्यासोबत झालं होतं. 2012 मध्ये रश्मी देसाई हिने नंदिश याच्यासोबत लग्न केलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2016 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रश्मी हिने नंदिश याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केलेले. आता अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.

 

 

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language