Hashtagintro

Rohit Sharma : तीन वर्षानंतर पुन्हा मुंबई इंडियन्सचं कॅप्टन बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

Rohit Sharma : तीन वर्षानंतर पुन्हा मुंबई इंडियन्सचं कॅप्टन बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनताच फ्रेंचायजीने खास अंदाजात त्यांचं स्वागत केलं आहे. तीन वर्षानंतर पुन्हा एकदा टीमची कमान संभाळणाऱ्या रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. सोबत ब्लू हॉर्ट आणि #CaptainRo हॅशटॅगचा वापर केला आहे. मुंबई इंडियन्सने एक सिनेमॅटिक व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे. यात रोहित टीमची जर्सी घालून पूर्ण आत्मविश्वासाने चालताना दिसतोय. व्हिडिओमध्ये गोल्डन क्राऊन आणि कॅप्टन रो सारख्या प्रतिमांच्या प्रतीकांचा वापर करुन त्याच्या पुनरागमनाचं सेलीब्रेशन करण्यात आलं आहे. रोहित कॅप्टन बनवल्याचे समजताच मुंबई इंडियन्सचे फॅन्सही खुश झाले. सोशल मीडियावर हिटमॅन आणि महान कॅप्टन अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने या प्रसंगी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. ‘मुस्कुराइए, सब लोग मुस्कुराइए.’ पोस्टसह ब्लू हार्ट आणि #CaptainRo हॅशटॅगचा वापर केला आहे. व्हिडिओच्या शेवटी रोहित शर्मा दिसतो.

मुंबई इंडियन्सने जारी केलेल्या निवेदनात, आयपीएलमध्ये पुन्हा एकदा फ्रँचायझीचे नेतृत्व करण्याबाबत रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित म्हणाला, “मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे. आगामी हंगामाबाबत नीता भाभी आणि आकाश यांच्यासोबत झालेली चर्चा खूप उत्साहवर्धक होती. आम्ही काय साध्य करू शकतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”

“मी 20व्या हंगामासाठी आणि पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. आमच्या ‘पलटन’ला (चाहत्यांना) आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. आमचा मुख्य भर आमच्या शैलीतील क्रिकेट खेळण्यावर, एकजुटीने स्पर्धा करण्यावर आणि खेळाचा आनंद घेण्यावर असेल.” याआधी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता. गुजरात टायटन्सकडून त्याला ट्रेड करण्यात आलेलं. पण हार्दिक मुंबईला ट्रॉफी जिंकवून देण्यात अपयशी ठरला.

 

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language