Hashtagintro

Russia Missile Attack | शांतता चर्चेनंतर काही तासांतच रशियाचा कीववर क्षेपणास्त्र हल्ला

कीव; वृत्तसंस्था : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन आणि अमेरिकेसोबत त्रिपक्षीय शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यास तत्त्वतः सहमती दर्शवल्यानंतर काही तासांतच रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. गुरुवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार मुलांसह २२ जण जखमी झाले आहेत.

रशियाने कीववर तीन टप्प्यांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये ड्निप्रो नदीवरील दक्षिणेकडील पूल, निवासी घरे, ऊर्जा पायाभूत सुविधा, रुग्णवाहिका केंद्र, कार्यालयीन इमारती आणि एका मठाचे नुकसान झाले. युक्रेनमधील ओडेसा या दक्षिणेकडील शहरातील बंदरालाही मोठा फटका बसला. देशातील एकूण १२ प्रदेशांमध्ये रशियाने हल्ले केल्याचे वृत्त आहे.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्यांवरून रशियाला शांतता प्रस्थापित करण्यात स्वारस्य नसल्याचा आरोप केला. युक्रेनला अधिक हवाई संरक्षण यंत्रणा, अमेरिकेकडून पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली आणि रशियावर कठोर निर्बंध लादण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. हिवाळ्यापूर्वी युक्रेनची ऊर्जा यंत्रणा उद्ध्वस्त करून नागरिकांना वीज आणि उष्णतेपासून वंचित ठेवण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा आरोप युक्रेनन केला. अमेरिकेने युक्रेनला मिळणाऱ्या स्टारशिल्ड उपग्रह संपर्क सेवेवरील मर्यादा मागे घेतलेल्या नाहीत. यामुळे युक्रेनच्या ड्रोन मोहिमांवर परिणाम झाला आहे.

पुतीन यांचा ‘मानवतावादी’ असा उल्लेख

बुधवारी सेंट पीटर्सबर्ग येथे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली. यावेळी विटकॉफ यांनी पुतीन यांचा उल्लेख ‘मानवतावादी’ असा केला. त्यावर युक्रेनचे परराष्ट्रमंत्री अँद्री सिबिहा यांनीही रशियाला खूश करण्याचे धोरण, अधीनता आणि स्तुतिसुमने यांमुळे रशियाची आक्रमकता थांबणार नसल्याचे स्पष्ट केले.

झेलेन्स्की यांना फटकारले

ओस्लो येथे मंगळवारी बंद दरवाजांआड झालेल्या बैठकीत ट्रम्प यांचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी झेलेन्स्की यांना फटकारल्याची माहिती आहे. विरोधातील वक्तव्यांमुळे ट्रम्प नाराज झाले आहेत, असे ते म्हणाले. त्यावर झेलेन्स्की यांनी असे काहीही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language