
Salman Khan House Recce: टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथे रविवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. आरोपींनी 7 राऊंड फायर केले होते. त्यात तो थोडक्यात बचावला. तर याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आरोपींनी सलमान खान याच्या घराची रेकी केल्याची माहिती आता समोर येत आहे. पोलिसांनी या घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने तीनही आरोपींचा ताबा घेतला आहे.
सलमान खान टार्गेटवर?
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींच्या टार्गेटवर भाईजान, सलमान खान होता का? यादृष्टीने तपासाची सूत्र फिरली आहे. आरोपींनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. तपास पुढे सरकत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी रात्री साडे सातच्या सुमारास आरोपींनी अगदी जवळून टायगरच्या कारवर गोळीबार केला होता. सात राऊंड त्यांनी फायर केले. पण एकाचे पिस्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी लागलीच सूत्र फिरवली आणि आरोपींना राजस्थानमधील कोटा येथे अटक करण्यात आली.
बातमीची लिंक कमेंटमध्ये
Source: TV9 Marathi Entertainment
