Hashtagintro

Salman Khan: सलमान खानच्या आजोबांना मिळालेला जमिनीत गाडलेला खजिना; त्यांनी पैसे सरकारला न देता थेट…

Salman Khan: सलमान खानच्या आजोबांना मिळालेला जमिनीत गाडलेला खजिना; त्यांनी पैसे सरकारला न देता थेट…

Salman Khan Family: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चाहतावर्ग किती मोठा आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला पाहण्यासाठी लोक तुफान गर्दी करत असतात.  सलमानचा चित्रपट रिलीज होताच चाहते फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला उत्सुक असतात. फक्त सलमानने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलेले नाही, तर त्यांच्या वडिलांनीही त्यांच्या लेखणीतून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. पण सलमान खानच्या आजोबांबद्दल बहुतेकांना काही गोष्टी माहित नसतील.

सलमान खानचे वडिल आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक सलीम खान यांच्या कुटुंबाबद्दल एक अनोखी माहिती समोर आली आहे. सलीम खान यांचे वडिल म्हणजे सलमान खान यांचे आजोबा अब्दुल रशीद खान हे ब्रिटिशकालीन भारतीय शाही पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी या पदावर कार्यरत होते. ज्या काळात भारतीयांना उच्च पद मिळणं कठीण होतं त्या काळात ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी इंदूरमध्ये DIG पर्यंतची मजल मारली होती. त्यांच्या शौर्यामुळे इंदूरचे महाराज यशंवतराव होळकर यांनी त्यांनी ‘दिलेर जंग’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.

एका जुन्या आख्यिकेनुसार, अब्दुल रशीद खान यांना इंदूरमध्ये एक गुप्त खजिना सापडला होता. त्यांनी इंदूरमधील बडावाली चौकी भागात एक वाडा किंवा इमारत विकत घेतली होती असं वृत्तात म्हटले आहे. जेव्हा त्या घराते बांधकाम  किंवा जुनी जमीन खणण्याचे काम सुरु होते, तेव्हा तिथे जमिनीखाली गाडलेला जुना खजिना त्यांना मिळाला.

असा दावा केला जात आहे की, तो खजिना मिळाल्यानंतर त्यांनी ती वास्तू किंवा जागा स्वत: जवळ न ठेवता ती तातडीने विकून टाकली. याऐवजी त्यांनी इंदूरच्याच पॉश समजल्या जाणाऱ्या पलासिया भागात मोठी जमीन विकत घेतली आणि तिथे भव्य घर बांधले.

सध्या सलमान खान हा बिगबॉस हिंदी शो होस्ट करत आहे. तो सोशल मीडियावरुन त्याच्या दैनंदिन अपडेट शेअर करत असतो. त्याची तब्येत मध्ये बिघडली होती तेव्हा त्याने सोशल मीडियावरुन त्याच्या तब्येतीची अपडेट वारंवार पोस्ट शेअर करुन देत होता.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language