Hashtagintro

Salman Khan : सलमान खानने ‘मातृभूमी’ च्या टिमला दिले खास सरप्राईज! फार्महाऊसवर वाटली 6 लाखांची….

Salman Khan : सलमान खानने ‘मातृभूमी’ च्या टिमला दिले खास सरप्राईज! फार्महाऊसवर वाटली 6 लाखांची….

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपल्या खास अंदाजासाठी ओळखला जातो. कधी आपल्या मित्रांसाठी, तर कधी सोबत काम करणाऱ्या लोकांसाठी तो काही ना काही खास करत असतो. आता पुन्हा एकदा सलमाने दिलेल्या एका गिफ्टची चर्चा होत आहे. निमित्त आहे त्याच्या आगामी मातृभूमी या सिनेमाचं. या चित्रपटच्या टिमला त्याने चक्क लाखो रूपयांचं महागडं गिफ्ट देऊन सरप्राईज दिलं आहे.

12 नोव्हेंबर रोजी सलमानने पनवेलमधील आपल्या फार्महाऊसवर चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञान टिमसाठी खास गेट- टुगेदर ठेवलं होतं. विशेष म्हणजे टीममधील कलाकारांना सुरूवातीला ही भेट चित्रपटाच्या प्रमोशनच्या नियोजनासाठी असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सगळ्यांना नेहमीची कामाची मिटिंग असेल असंच वाटलं होतं. पण तिथे पोहोचल्यानंतर सलमानने त्यांच्यासाठी वेगळाच बेत आखल्याचं समोर आलं.

सलमाने मातृभूमी चित्रपटातील 20 ते 25 कलाकारांना महागडी स्वीस घड्याळं भेट दिल्याचं माहिती आहे. या प्रत्येक घड्याळज्याची किंमत साधारण 2 लाख ते 6 लाख रूपयापर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. पुरूष कलाकार आणि टीममधील सदस्यांना longines आणि TAG Heuer या ब्रँडची घड्याळ देण्यात आली, तर महिला सदस्यांना rado ब्रँडची घड्याळं भेट देण्यात आली. ही घडयाळ कपूर वॉच कंपनीकडून घेतल्यांचंही वृत्त आहे.

या खास भेटीमागे चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या टीमचे आभार मानण्याचा सलामानचा हेतू होता असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया, अभिनेत्री चित्रांगदा सिंह, अंकुर भाटिया, विपिन भारद्वाज, तान्या देसाई आणि संवादलेखक चिंतन शाह उपस्थित होते. टीममधील काही सदस्यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडीयावरही शेअर केले आहेत.

दरम्यान, मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच सलमानने आपल्या टीमला दिलेल्या या खास भेटीची बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language