Hashtagintro

Sambhajinagar Crime : गणेश विसर्जनातील वाद पुन्हा उफाळला; वैजापुरात तुफान हाणामारी, तिघे गंभीर

वैजापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद पुन्हा उमटले असून, शनिवारी (दि. ३१) सायंकाळी शहरात दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या मारहाणीत तीन तरुण रक्तबंबाळ झाले असून, विशाल कडे, सुजित राजपूत आणि तुषार पठारे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान येवला रोडवर दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. त्यावेळी चापट-बुक्क्यांसह हातातील कड्याने मारहाण करून काही जणांना जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पुन्हा याच वादाच्या अनुषंगाने दोन गट झालेल्या मारहाणीत तिघांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर जखमींना तातडीने वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.

या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा दोन गटांतील संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार शहरात घडू नये यासाठी शहरात पोलिसांनी चोख बंदोतस्त ठेवला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language