Hashtagintro

Sambhajinagar News : वक्फ बोर्डाच्या आक्षेपानंतर मनपा तपासणार गिरणीच्या जागेची कागदपत्रे

After the objection of the Waqf Board, the Municipal Corporation will check the documents of the mill site

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रोशनगेट परिसरातील गिरणीच्या खुल्या जागेच्या सपाटीकरणावरून महापालिका आणि वक्फ बोर्ड यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या जागेवर सार्वजनिक उपयोगासाठी विकासकामे करण्यापूर्वी वक्फ बोर्डाशी सल्लामसलत करणे आवश्यक असल्याचा आक्षेप बोर्डान घेतला आहे.

दुसरीकडे, संबंधित जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे सध्या महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे शुक्रवारी (दि.२३) आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. या कागदपत्रांची तपासणी करून बोर्डाला पत्र दिले जाईल. त्यानंतर न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रोशनगेट परिसरातील गिरणीच्या खुल्या जागेच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या निर्णयानुसार महापालिकेने ३.७९ एकर जागेचे सपाटीकरण सुरू केले होते. मात्र, या कामावर वक्फ बोर्डाने आक्षेप नोंदविल्याने जागेची मालकी आणि विकासकामांच्या प्रक्रियेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैजाय खान यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या कामाबाबत आक्षेप नोंदविला आहे. बोर्डाच्या महसूल अभिलेखांनुसार रोशनगेट परिसरातील जसवंतसिंगपुरा येथे गट क्रमांक दोनमध्ये संबंधित जमीन असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या जागेवर महापालिकेमार्फत लहान मुलांसाठी क्रीडांगण आणि स्टेडियम उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती मिळाल्याचेही पत्रात म्हटले आहे. कोणत्याही जागेचा सार्वजनिक कामासाठी वापर करताना नियमानुसार राज्य वक्फ बोर्डाशी सल्लामसलत करणे बंधनकारक असल्याचा दावा बोर्डाने केला आहे. मात्र, बोर्डाशी पत्रव्यवहार किंवा चर्चा न करता विकासकामे सुरू करण्यात येत असल्याने हे नियमांचे उल्लंघन असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आम्ही केवळ सपाटीकरण केले

या आक्षेपाबाबत आयुक्त अमोल येडगे यांनी भूमिका स्पष्ट केली. संबंधित जागा गिरणीची असल्याची माहिती महापालिकेकडे होती. हे प्रकरण न्यायालयात असून, न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त समितीने याच जागेतील एक एकर जमीन वीज वितरण कंपनीला दिली होती. त्या वेळी वक्फ बोडनि आक्षेप घेतला नव्हता, असे त्यांनी सांगितले. महापालिकेने सध्या केवळ जागेचे सपाटीकरण केले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. तसेच नशेखोरांचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कचरा हटवून जागेचे सपाटीकरण करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language