Hashtagintro

Sangli Accident : नागजजवळ तिहेरी अपघातात आरेवाडीच्या तरुणाचा मृत्यू

नागज : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रसाद काशिलिंग कोळेकर (वय २२, रा. आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवार, दि. २४ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद कोळेकर हा दुचाकीवरून (क्र. एमएच ४५ आर ७४७२) आरेवाडीहून कालव्यावरून नागजच्या दिशेने येत होता. दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ कंटेनर (क्र. डीडी ०३ आर ९६५९) मिरजेच्या दिशेने जाण्यासाठी उभा होता. त्याच्या दुचाकीची उभ्या कंटेनरला जोरदार धडक बसली. या अपघातात प्रसाद रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पाठीमागून येणाऱ्या बसने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रसाद कोळेकर याच्या अपघाती मृत्यूने आरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language