Hashtagintro

Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

तासगाव : कवठे एकंद (ता. तासगाव) येथून दिवाळीचे फटाके घेऊन घरी जात असताना समोरून आलेल्या मोटारीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोज उर्फ राजू महादेव मोहिते (वय ४२, रा. मांजर्डे, ता. तासगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक शहंशाह सिफायनउल्ला खान (वय २९, सध्या रा. कराड, मूळ रा. टिकोना, उत्तर प्रदेश) याच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज मोहिते हे दिवाळीनिमित्त फटाके आणण्यासाठी दुचाकीवरून (एमएच १०, डीसी ४६३०) कवठे एकंद येथे गेले होते. फटाके खरेदी करून ते मांजर्डे येथे परतत होते. दत्तमाळ परिसरातील शेतकरी मार्केटजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी मोटार (युपी ३२, आरएस ४७२५) मोहिते यांच्या दुचाकीला येऊन धडकली. या अपघातात मोहिते यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language