Hashtagintro

Sangli Fraud : सांगलीत साडेआठ लाखांचा गंडा

सांगली : शहरातील हॉटेल न्यू प्राईड व मल्टिप्लेक्स येथे भारतीय सैन्य दलाचे औषधालय सुरू करण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला आठ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समीर राजेंद्र शहा यांनी इब्राहिम बापू जमादार (रा. धामणी रस्ता, सांगली), विक्रांत अनिल पाटील (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), संतोष पाटील, आशिष चंद्रकांत शेंडगे (रा. अंधेरी, मुंबई) आणि कौस्तुभ किंगे या पाचजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समीर शहा यांचे सांगलीत हॉटेल न्यू प्राईड व मल्टिप्लेक्स आहे. या ठिकाणी भारतीय सैन्यदलाचे औषधालय सुरू करण्याचे आमिष संशयितांनी शहा यांना दाखवले होते. ही मालमत्ता आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस या संस्थेस भाड्याने देण्यासाठी आणि शासकीय यादीवर समाविष्ट करून घेण्यासाठी संशयितांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. तसेच, या प्रक्रियेतील बैठकांच्या खर्चासाठी ५० हजार रुपये घेतले.

त्यानुसार समीर शहा यांनी आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस या नावाने दहा लाख रुपयांचा डीडी दिला होता. हा डीडी नेरूळ येथील नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह बँकेतील संतोष पाटील याच्या खात्यावर जमा करण्यात आला. मात्र, एकूण दहा लाख ५० हजार रुपये देऊनही प्रत्यक्षात औषधालय सुरू झाले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language