Hashtagintro

Sangli News : बिरणवाडी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्याने खळबळ

मांजर्डे : बिरणवाडी (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीला बुधवार, दि. २५ रोजी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामस्थ गणपती कस्तुरी यांनी कुलूप ठोकल्याने गावात खळबळ उडाली. सर्व पदाधिकारी व अधिकारी समोर आल्याशिवाय कुलूप काढणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. समाजासाठीच्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

ग्रामपंचायत कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत उचललेल्या या पावलामुळे काही काळ कामकाज ठप्प झाले. माहिती मिळताच तासगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सरकारी कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली; मात्र उशिरापर्यंत तक्रार नोंद झालेली नव्हती. कारवाई झाली तरी चालेल, गुन्हा दाखल करायचा असेल तर करू द्या; मात्र कुलूप काढणार नाही, अशी भूमिका घेत कस्तुरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.

दरम्यान, सरपंच उमेश मोरे व अन्य सदस्यांनी कुलूप तोडून पुन्हा कामकाज सुरू केले. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी बिरणवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. कुलूप का लावले, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कोणतीही माहिती हवी असल्यास माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करावा; ती नियमानुसार दिली जाईल, असे सरपंच उमेश मोरे यांनी सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language