Hashtagintro

Sanjay Dutt : मी संजय दत्तच्या प्रेमात होते, त्याला कधीच…प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Sanjay Dutt : मी संजय दत्तच्या प्रेमात होते, त्याला कधीच…प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

संजय दत्तवर 90 च्या काळात अनेक मुली भाळायच्या. त्याचे सिनेमे पाहण्यासाठी मुली आसुलेल्या असायच्या. त्याचे डोळे, त्याचे लांब केस, आणि त्याची स्माईल कित्येक मुली याच्या प्रेमात होत्या. हीच प्रेमाची भावना त्या काळात एका अभिनेत्रीच्या देखील मनात होती. जिने संजय दत्तसोबत कामही केलं होतं. पण ती तिने कधी ती भावना बोलून दाखवली नव्हती. नाहीतर आज कदाचित त्यांच लग्नही झालं असतं. कित्येक वर्षांनंतर तिने ही गोष्ट आज जगजाहीर केली आहे.

कोण होती ती अभिनेत्री?

सोनम खानने नुकताच संजय दत्तसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय दत्त हा असा एकमेव अभिनेता होता, ज्याच्यासोबत काम करताना सोनमला त्याच्यावर प्रेम झालं होतं. असं तिने सांगितलं. मात्र संजय दत्तला त्या प्रेमाची अजिबात कल्पना नव्हती आणि मीही कधी स्वत: हून सांगितले नव्हते. असं सोनम म्हणाली.

सोनमने संजय दत्तचं कौतुक करताना त्यांना मनाने खूप चांगला माणूस आणि उत्तम सहकलाकार म्हटलं. त्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम करताना घालवलेल्या आठवणी आजही तिच्यासाठी खास असल्याचं सोनमने सांगितलं. तीने फोटो पोस्ट करत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Khan (@sonamkhan_72)

 

 

‘क्रोध’ सिनेमात एकत्र काम

सोनम खान आणि संजय दत्त यांनी 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रोध’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘शशिलाल के. नायर’ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या अॅक्शन चित्रपटात ‘सनी देओल’ आणि ‘अमृता सिंह’ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

 

सोनम खानचा चित्रपटप्रवास

सोनम खानने 1987 मध्ये ‘सम्राट’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या ‘विजय’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘त्रिदेव’ , ‘मिट्टी और सोना’ , ‘क्रोध’ , ‘अजोबा’ , आणि ‘विश्वात्मा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेला ‘इन्सानियत’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

अनेक वर्षांनंतर सोनम खानने सांगितलेल्या या जुन्या आठवणीमुळे संजय दत्त आणि तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ज्या भावना तिने त्या काळात मनातच ठेवल्या, त्याबद्दल आता तिने मोकळेपणाने सांगितलं आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language