Hashtagintro

Satara News| ‘पणत्यांचं तेज अन्‌‍ कंदिलाची शोभा‌’

सातारा : दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण आहे. अबालवृध्द हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. महागाई असली तरी दिवाळी साजरी केली जातेच. दीपोत्सवाला आता खऱ्या अर्थाने उधाण आले असून त्या सणाची नजाकत साऱ्यांनाच भूरळ घालत आहे. आणखी दोन दिवस दिवाळीचा उत्साह कायम राहणार आहे.

पणत्यांचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्याचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई आणि मनामनातून उमलणारी फूलं असाच या सणाचा माहोल असतो. यंदाही या दीपोत्सवाला असेच उधाण येवू लागले आहे. दिवाळी या एकाच शब्दात जीवनाचं सार, मांगल्य सामावलं असून पणत्यांचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्याचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई अशा मनमोहक वातावरणाने दिवाळीची अपुर्वाई नजरेत साठून राहिली आहे.

रविवारी झालेल्या लक्ष्मीपूजन व पहिल्या अभ्यंगस्नानानंतर आता खऱ्या अर्थाने दिवाळीचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला आहे. या दीपोत्सवाला गुरूवारी वसुबारसपासून सुरूवात झाली. अवघं जनजीवन आता फटाक्यांचा आवाज अन्‌‍ दिवाळीच्या झगमगाटात हरवून गेले आहे. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

बाजारपेठ परिसराला नवा लूक…

दिवाळीमुळे साताऱ्यासह जिल्ह्यातील बाजारपेठांनी गेल्या कित्येक दिवसांपासून नवा लूक परिधान केला आहे. प्रत्यक्ष दिवाळीला सुरूवात होण्यापूर्वी सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत विविध रंगातील आकारातील आकाशकंदील, पणत्या, रांगोळीचे रंग, रेडीमेड फराळ, किराणा साहित्यासह, कपडे, फटाका, आकाशदिवे, भेट वस्तू यांनी बाजारपेठा सजल्या होत्या. आता पाडवा व भाऊबिजमुळे हा परिसर आणखी फुलणार आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language