Hashtagintro

Sauropod Dinosaurs | समुद्राच्या पोटात आढळले १३ कोटी वर्षे जुने ‘ज्युरासिक पार्क’!

130 Million Year Old Fossils क्रोएशिएाच्या समुद्रकिनाऱ्यावर संशोधकाना डायनासोरचे अवशेष सापडले आहेत, या समुद्रात मिळालेले हे तुकडे वरवर अगदी खडकासारखे दिसत होते. पण याची बारकाईन पाहणी केल्यावर ते डायनासोरचे अवशेष असल्याचे लक्षात आले. हे अवशेष १३० दशलक्ष (सुमारे १३ कोटी) वर्षे जुने डायनासोरचे हाड असल्याचे उघड झाले आहे.

हाडांच्या अंतर्गत रचनेतील ‘ट्रॅबेक्युली’ (सच्छिद्र जाळीदार भाग), जी आजच्या सस्तन प्राण्यांच्या हाडांसारखी असते, त्यावरून हे अवशेष डायनासोरचे असल्याचे सिद्ध झाले आहे. समुद्राच्या तळात डायनासोरचे जीवाश्म सापडण्याची ही जगातील पहिलीच घटना मानली जात आहे. ज्यरासिक पार्क चित्रपटातील महाकाय सॉरोपॉड या प्रजातीचे हे अवशेष असल्याचा अंदाज आहे.

समुद्राच्या लाटांखालील ऐतिहासिक शोध

क्रोएशियातील इस्ट्रिया द्वीपकल्पावरील बाले (Bale) गावाजवळील समुद्रात १.५ ते ६ मीटर खोलीवर हे उत्खनन करण्यात आले. सामान्यतः डायनासोरचे जीवाश्म जमिनीवर, वाळवंटात किंवा कोरड्या पर्वतीय भागात आढळतात. मात्र समुद्राच्या पाण्याखाली अशा प्रकारचे अखंड अवशेष मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जगभरातील जीवाश्मशास्त्रज्ञ या शोधामुळे रोमांचित झाले आहेत.

या मोहिमेदरम्यान प्रसिद्ध इटालियन जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. फॅबियो मार्को डल्ला व्हेकिया (Fabio Marco Dalla Vecchia) यांनी या अवशेषांचे वर्गीकरण आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरण केले. प्राथमिक निष्कर्षानुसार, ही हाडे डायनासोरच्या एका पूर्णपणे नव्या प्रजातीची आहेत. या शोधाचे मूळ श्रेय आणि शोधकर्त्याच्या सन्मानार्थ या प्रजातीचे वैज्ञानिक नामकरण ‘हिस्ट्रियोसॉरस बोस्करिओली’ (Histriasaurus boscarollii) असे करण्यात आले.

‘जुरासिक पार्क’मधील भव्य सॉरोपॉडची आठवण

हा डायनासोर ‘सॉरोपॉड’ (Sauropod) या गटातील आहे. प्रसिद्ध ‘जुरासिक पार्क’ चित्रपटात सुरुवातीला दिसणाऱ्या भव्य, लांब मानेच्या डायनासोरसारखीच याची शरीररचना होती. प्रचंड लांब मान, खांबासारखे भक्कम चार पाय आणि लांब शेपटी ही या शाकाहारी महाकाय जीवांची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

१३ कोटी वर्षांपूर्वीची भौगोलिक रचना

संशोधनानुसार, सुमारे १३० दशलक्ष वर्षांपूर्वी आजचा इस्ट्रिया भाग उत्तर आफ्रिकेजवळ किंवा प्राचीन टेथिस महासागरातील (सध्याच्या भूमध्य समुद्राच्या परिसरात) एका बेटाच्या स्वरूपात अस्तित्वात होता. त्या काळात हा भूभाग उथळ पाण्याने आणि दलदलीने वेढलेला होता, ज्यामुळे हे महाकाय प्राणी येथे वावरत असावेत आणि नंतर भूगर्भीय बदलांमुळे त्यांचे अवशेष समुद्राच्या तळाशी गाडले गेले. असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language