Hashtagintro

SBI Bank : देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी, मोबाइल नंबरपासून..

SBI Bank : देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी, मोबाइल नंबरपासून..

भारतीय स्टेट बँकेच्या खातेधारकांचा महत्वाचा डेटा लीक झाल्याची शक्यता आहे. यात मोबाइल नंबरपासून Address पर्यंत गोष्टी आहेत. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने स्वत: ही माहिती दिली. काही ग्राहकांची माहिती डार्क वेबवर समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बँकेने तात्काळ सर्व प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. एसबीआयने 21 ऑक्टोंबरला शेअर बाजाराला एक विस्तृत रिपोर्ट सोपवला. सायबर सुरक्षा ध्यानात घेऊन आवश्यक पावलं उचलली जात असल्याचं त्यात सांगण्यात आलं. ही घटना गांभीर्याने घेत असल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 16 ऑक्टोंबर 2026 रोजी या प्रकरणाची सुरुवात झाली. एसबीआयला थ्रेट इंटेलिजेंस सर्विस देणारी कंपनी, संरक्षण सायबर एजन्सीस सीईआरटी-इनला (CERT-In) एक अलर्ट मिळाला होता.

बँकेच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेब वर लीक झालाय हे अलर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. सूचना मिळताच बँकेने तपास सुरु केला. यावेळी डार्क वेबवरील 3.75 लाख रेकॉर्ड्स तपासण्यात आले. या डेटाचं सखोल विश्लेषण झालं. त्यात 3,897 ग्राहकांचे रेकॉर्ड असे आहेत, त्यांची व्यक्तीगत ओळख आणि PII शी संबंधित महत्वाची डार्क वेबवर उपलब्ध आहे. संभाव्य डेटा लीकमध्ये ग्राहकांचे रजिस्टर्ड मोबाइल नंबर, जन्मतिथी, नाव, जेंडर, ईमेल आयडीपासून त्यांच्या घरच्या पत्त्यापर्यंतची माहिती आहे. विषय इथेच संपत नाही, त्या शिवाय बँकेच्या ब्रांचच नाव, सीआयएफ ओळख नंबरसह लोनशी संबंधित रेकॉर्ड मेटाडेटा सुद्धा डार्क वेबवर आहे. कुठल्याही व्यक्तीची इतकी खासगी माहिती एकाचवेळी इंटरनेटवर डार्क वेबवर असेल तर त्याच्यासोबत सायबर फसवणूक किंवा फिशिंग हल्ला होण्याचा धोका वाढतो.

चौकशीमागचा उद्देश काय?

डेटा लीक बद्दल अलर्ट मिळताच बँकेने लगेच कारवाई सुरु केली. SBI ने सायबर घटनेशी संबंधित सर्व महत्वाचे प्रोटोकॉल एक्टिव केले. या सर्व प्रकाराच्या निष्पक्ष चौकशीसाठी एक स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीची नियुक्ती केली आहे. ही एजन्सी सीईआरटी-इनच्या अधिकृत पॅनलमध्ये आहे. डार्क वेबवर जो डेटा आहे, तो किती योग्य आणि खरा आहे हे शोधून काढणं हा चौकशीमागचा उद्देश आहे. हा डेटा कुठून लीक झाला, त्याचा स्त्रोत काय, हे सुद्धा तपास टीम शोधून काढतेय. ग्राहकांना भविष्यात कुठलाही धोका निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्याला बँकेचं प्राधान्य आहे.

एसबीआयने काय म्हटलं?

या बातमी नंतर ग्राहकांच्या मनात भिती निर्माण होणं स्वाभाविक आहे, कारण इथे विषय पैशांचा आहे. या घटनेमुळे बँकेच्या कामकाजावर काहीही परिणाम झालेला नाही, हे सुद्धा बँकेने स्पष्ट केलं. बँकेची आर्थिक कामगिरी आणि व्यावसायिक कामकाज सामान्यपणे सुरु आहे. खातेधारकांनी त्रस्त होण्याची काही गरज नाहीय. बँकेशी संबंधित सर्व सेवा विनाअडथळा सुरु आहेत.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language