Hashtagintro

SBI Data Leak : SBI च्या लाखो ग्राहकांचा डेटा चोरीला? नवी मुंबईतील सर्व्हरवर सायबर हल्ला, 3.75 लाख रेकॉर्ड्स लंपास

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील बँकेच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात हॅकर्सनी सुमारे 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, घराचे पत्ते, कर्जासाठी केलेले अर्ज आणि नवीन बँक खाते उघडण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ( SBI Data Breach)
मिळालेल्या माहितीनुसार, हा सायबर हल्ला 10 ते 15 ऑक्टोबरदरम्यान झाला होता. मात्र, चोरी झालेली माहिती डार्क वेबवर अपलोड झाल्यानंतर हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आला. त्यानंतर बँकेने अंतर्गत तपास सुरू केला. या प्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/15/sugarcane-farmers-in-distress-due-to-drought-dhananjay-mahadik-makes-a-major-demand-to-the-centre-seeking-assistance-of-rs-700-per-tonne/
बँकेच्या तक्रारीनुसार, ‘सिरियासिम’ (Syriasim) नावाच्या हॅकर ग्रुपशी संबंधित अज्ञात व्यक्तींनी सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून महत्त्वाची माहिती चोरली. या हल्ल्यात सुमारे 32 CSV फाईल्समधील 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरीला गेल्याची माहिती आहे. याशिवाय JSON फाईल्स आणि 2,721 PDF फाईल्सही हॅकर्सनी लंपास केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कागदपत्रांमध्ये सुमारे 4,280 ग्राहकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती असल्याचे सांगितले जात आहे. ( SBI customers)
दरम्यान, बँकेने डार्क वेबवर उपलब्ध असलेला चोरीचा डेटा हटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, हॅकर्सनी या माहितीच्या प्रती तयार केल्या असतील किंवा इतर ठिकाणी शेअर केल्या असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

SBI ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
या घटनेनंतर सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी बँक ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. चोरी झालेल्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार बनावट कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे ग्राहकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणालाही OTP, ATM पिन, बँकिंग पासवर्ड किंवा गोपनीय माहिती देऊ नका. बँकेच्या नावाने फोन करून वैयक्तिक माहिती मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. आपल्या बँक खात्यातील व्यवहारांवरही नियमित लक्ष ठेवा.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language