Hashtagintro

Shafaq Naaz : माझा नवरा मुस्लिम आहे, कुंकू लावल्यानं धर्म…धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीची चपराक

Shafaq Naaz : माझा नवरा मुस्लिम आहे, कुंकू लावल्यानं धर्म…धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीची चपराक

करवा चौथच्या दिवशी लाल साडी, केसांत कुंकू आणि हातात बांगड्या, टीव्ही अभिनेत्री शफाक नाझच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. काहींनी हिंदू सण साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी तिच्या धर्मावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण आता अभिनेत्रीनं यावर मौन सोडलं असून, ट्रोलर्सना दिलेल्या उत्तरामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. शफाकनं स्पष्टपणे सांगितलं की, कुंकू लावल्यानं कोणाचाही धर्म बदलत नाही. करवा चौथ साजरा केल्याबद्दल तिला आणि तिच्या पतीला टार्गेट करणाऱ्यांवरही तिनं जोरदार टीका केली.

ट्रोलर्सना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

अभिनेत्रीनं सांगितलं की, तिनं नुकतेच तिच्या करवा चौथ सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिला लाल साडी आणि कुंकूमध्ये पाहून काही युझर्सनी तिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. आपली नाराजी व्यक्त करत शफाक म्हणाली, ‘मी नुकताच करवा चौथ साजरा करतानाचे काही फोटो पोस्ट केले होते. मी लाल साडी नेसली होती आणि भांगात कुंकू लावलं होतं. मला वाटलं की, फोटो छान आहेत, पण अचानक कमेंट्स सेक्शनमध्ये मला शिवीगाळ, ट्रोलिंग आणि अश्लील भाषा दिसू लागली. जणू काही कुंकू लावल्यानं माझा धर्मच बदलला आहे, असं वाटत होतं. सर्वप्रथम, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते, माझ्या पतीचं नाव झीशान आहे आणि तो मुस्लिम आहे. दुसरं म्हणजे, मी कुंकू लावते म्हणून मी मुस्लिम राहत नाही असं होत नाही. माझा धर्म इतका क्षुल्लक आहे का?’

शफाक नाझनंही तिचा पती झीशानला या वादात ओढणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, एखादा सण साजरा केल्यानं किंवा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं कुणालाही दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे की, आज लोकांना एकमेकांच्या धर्माचा आणि श्रद्धांचा आदर करायला शिकवावं लागत आहे. कुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांचा संदर्भ देत अभिनेत्री म्हणाली की, दुसऱ्याच्या धर्माचा अपमान करून काहीही साध्य होत नाही. प्रत्येक धर्म लोकांना एकमेकांचा आदर करायला शिकवतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shafaq Naaz (@shafaqnaaz777)

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं कौतुक करत शफाक म्हणाली की, येथे वेगवेगळ्या धर्मांचे आणि संस्कृतींचे लोक राहतात. मग दुसऱ्या समाजाचा सण साजरा करण्यात काय हरकत आहे? ती म्हणाली, ‘हेच तर भारताचं सौंदर्य आहे की, येथे इतक्या संस्कृती आहेत. कोणताही सण साजरा करण्यात काय अडचण आहे? मी हे नेहमीच करत आले आहे.’ अभिनेत्रीनं असंही सांगितलं की, तिनं अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे आणि तिला विविध संस्कृतींबद्दल नेहमीच आवड राहिली आहे. तिचा धर्म तिला इतरांचा आदर करायला शिकवतो.

शफाक म्हणाली, ‘मी ईद, दिवाळी आणि होळीला फोटो पोस्ट करेन. मला जे वाटेल ते मी करेन. जर कोणाला याचा त्रास होत असेल, तर ते मला अनफॉलो करू शकतात. मी माझ्या श्रद्धेचं पालन करणं थांबवणार नाही.’

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language