Hashtagintro

Sharmishtha Raut : 10 वर्षांचा संसार मोडला, दुसऱ्या लग्नाआधी लिव्ह-इनचा निर्णय; शर्मिष्ठा राऊतचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

Sharmishtha Raut : 10 वर्षांचा संसार मोडला, दुसऱ्या लग्नाआधी लिव्ह-इनचा निर्णय; शर्मिष्ठा राऊतचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम शर्मिष्ठा राऊत तिच्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. पहिल्या लग्नाचा दहा वर्षांचा संसार मोडल्यानंतर शर्मिष्ठानं आयुष्याला नव्यानं सुरुवात केली. ऑक्टोबर 2020 मध्ये तिनं तेजस देसाईसोबत दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे दोघांचंही हे दुसरं लग्न असून त्यांचं अरेंज्ड मॅरेज होतं. मात्र, या लग्नामागची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. सुरुवातीला शर्मिष्ठाला ओळखतही नसलेल्या तेजसनं अभिनेत्रीशी लग्न करण्यास नकार दिला होता. पण पहिल्याच भेटीत त्यानं तिला थेट लग्नाची मागणी घातली.

शर्मिष्ठा राऊतच्या लग्नाचा किस्सा

शर्मिष्ठा राऊतचा 2018 मध्ये पहिला घटस्फोट झाला होता. जवळपास दहा वर्षांचा संसार संपल्यानंतर तिनं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिनं आपल्या आई-वडिलांशी चर्चा केली होती. कुटुंबीयांकडून तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच तेजस देसाईचं स्थळ समोर आलं. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाचा नवरा तेजस देसाई म्हणाला की, ’18 ऑगस्ट 2019 ला रात्री मला शर्मिष्ठाचं स्थळ आलं होतं. मी एका इव्हेंटला गेलो होतो. तिथे माझ्या भावाचा आणि हिच्या बहिणीचा एक कॉमन फ्रेंड होता. त्याच इव्हेंटला शर्मिष्ठा पाहुणी म्हणून आली होती. त्याच कार्यक्रमात त्या मित्रानं हिच्या बहिणीला विचारलं की, शर्मिष्ठानं पुढे काय विचार केलाय. तर तिच्या बहिणीनं तिच्यासाठी स्थळ बघतोय असं सांगितलं. मग तो म्हणाला, या इव्हेंटचा ऑर्गनायझर श्रेयस आहे, त्याचा मोठा भाऊ तेजस आहे. त्याचा पण घटस्फोट झाला आहे आणि लग्नाचं बघत आहेत.’

‘त्यानंतर मला माझ्या आई आणि भावाचा फोन आला, त्यांनी सांगितलं की शर्मिष्ठा राऊतचं स्थळ आलं आहे. मी रुंजीची शपथ घेऊन सांगतो की, मला त्यावेळी शर्मिष्ठा राऊत ही व्यक्ती माहीत नव्हती. मला घरातल्यांनी वेड्यात काढलं होतं. मी बिग बॉसचा एकही एपिसोड पाहिला नाही. माझा आणि मालिकांचा दूरपर्यंत संबंध नाही. तिला भेटलो तेव्हापर्यंत फक्त 2-3 मालिका बघितल्या होत्या. विनोदी मालिका वगैरे मी पाहतो. मग घरचे बोलले की, एकदा तिच्याबद्दल सर्च कर. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मला अभिनेत्रीशी लग्न करायचं नाही. मला ते नखरे, तो ऑरा झेपणार नाही.’

पुढे शर्मिष्ठा म्हणाली, ‘मला रेशमताई, सई, मेघा यांनी ब्रेनवॉश केलं. त्यामुळे मी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न करताना मुलगा मला ओळखत नसेल असा असेल तर चांगलंय, असा निकष ठेवला होता. त्या निकषात हा बसला.’

सुरुवातीला दोघांनीही एकमेकांना भेटण्यास फारसा उत्साह दाखवला नव्हता. मात्र, काही मित्रांनी तेजसला शर्मिष्ठा चांगली आणि साधी मुलगी असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं तिला भेटण्याचं ठरवलं. दोघांची पहिली भेट झाली. त्यांनी एकत्र जेवण केलं, त्यानंतर क्लबमध्ये जाऊन डान्सही केला. शर्मिष्ठाला घरी सोडायला गेल्यानंतर तेजसनं थेट तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय,’ असं त्यानं शर्मिष्ठाला सांगितलं. मात्र, शर्मिष्ठानं लगेच होकार दिला नाही. तिनं विचार करण्यासाठी वेळ मागितला आणि मी फोन करेन , तू फोन करू नकोस, असं त्याला स्पष्ट सांगितलं.

काही दिवसांनी शर्मिष्ठाने तेजसला फोन केला आणि आधी मित्र म्हणून एकमेकांना जाणून घेऊया, असं सांगितलं. त्यानंतर दोघे सलग आठ ते दहा दिवस भेटत राहिले. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. शर्मिष्ठाने नात्याला होकार दिला. दोघांचाही याआधीचा वैवाहिक अनुभव चांगला नव्हता. त्यामुळे नव्या नात्यात कोणतीही घाई करायची नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. याबद्दल बोलताना शर्मिष्ठाने, ‘दोघेही दुधाने पोळलो होतो, त्यामुळे ताकही फुंकून पिऊ. नात्यात घाई नको करायला,’ असं म्हटलं. एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर शर्मिष्ठा आणि तेजस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करोना काळात ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language