जेव्हा आपल्याला ताप येतो, गळ्यात खवखव होते, तेव्हा आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना अँटीबायोटिक्सने आराम मिळेल असं वाटतं. बहुतांशवेळा सर्दी फ्लू किंवा हवामान बदलल्यानंतर गळ्यात इन्फेक्शन होतं. व्हायरसमुळे ते होतं. अँटीबायोटिक्स व्हायरसवर काम करत नाही.
फक्त बॅक्टेरियामुळे होणाऱ्या इन्फेक्शनच्या उपचारात अँटीबायोटिक्स उपयुक्त ठरतात. विनाकारण अँटीबायोटिक्स घेण्याने काही फायदा होत नाही. उलट त्रास वाढतो असं डॉक्टर गोपाळ शर्मा यांनी सांगितलं. ते कैलाश हॉस्पिटल डेहराडून मध्ये सीनियर कंसलटेंट इंटरनल मेडिसिन आहेत.
अनेकांना अँटीबायोटिक घेतल्यानंतर उल्टी सारखं वाटतं. त्या शिवाय पोट दुखी, स्कीनवर रेशेज असे परिणाम दिसतात. अशी औषध घेतल्यानंतर काही बाबतीत गंभीर अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.
अँटीबायोटिक मुळे आपल्या पोटात जे चांगले बॅक्टेरिया असतात, त्यांचं संतुलन सुद्धा बिघडतं. चांगले बॅक्टेरिया नेहमी आपल्या शरीरात असतात. अन्न पचनास असे बॅक्टेरिया मदत करतात.
जेव्हा आपण अनावश्यक अँटिबायोटिक्स घेतो, तेव्हा हळूहळू बॅक्टेरिया या औषधांच्या परिणामांपासून स्वत:ला कसं वाचवायचं ते शिकतात. याचा अर्थ असा आहे की, पुढे जाऊन बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होणार असेल तर त्यावेळी हीचं औषध कदाचित व्यवस्थित काम करणार नाहीत.
Source: TV9 Marathi Health





