Hashtagintro

Smart Anganwadi Kitchen Set: अंगणवाड्यांना स्मार्ट किचन सेटसाठी १ कोटींचा निधी मंजूर

नगर: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचा स्मार्ट अंगणवाडी म्हणून विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून अंगणवाडी केंद्रांना किचन सेट पुरविण्याची योजना महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावित केली असून, लवकर त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या ३१ जानेवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील उपयोजना ‘क’ मधील मुद्दा क्रमांक चारनुसार अंगणवाडी केंद्रांतील स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण करण्याची तरतूद आहे.

याच आधारावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना किचन सेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, अहिल्यानगर यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे या योजनेसाठी एक कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आनंद भंडारी यांनी या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती समजली. मात्र, या निधीतून जिल्ह्यातील नेमक्या किती अंगणवाड्यांना किचन सेट मिळणार, एका संचाची किंमत किती असेल, त्यात कोणते साहित्य दिसेल, याबाबतची अंगणवाडी सेविकांमध्येही उत्सुकता आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language