Hashtagintro

Sohail Khan Death: सकाळी उठला, लॉनमध्ये गेला… निधनापूर्वी सोहेल खानसोबत हॉटेलमध्ये काय घडलं?

Sohail Khan Death: सकाळी उठला, लॉनमध्ये गेला… निधनापूर्वी सोहेल खानसोबत हॉटेलमध्ये काय घडलं?

काल 25 नोव्हेंबर रोजी बांगलादेश फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेते सोहेल खान यांचे निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सोहेल खान आपल्या ‘नसीब’ या फिल्मच्या शूटिंगसाठी गेले होते. पण तिकडून ते घरीच आले नाहीत. हॉटेलमधून अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. आता त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया…

सोहेल खान ‘नसीब’ चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी केले होते. संपूर्ण चित्रपटाची टीम ही एका हॉटेलमध्ये होती. सकाळी नेहमीप्रमाणे सोहेल खान उठले. हॉटेलच्या लॉनमध्ये गेले. तेथे नाश्ता करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांनतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिग्दर्शक आणि निर्माते मोहम्मद इकबाल यांनी सोहेल खान यांच्या निधनाची पुष्टी केली. मोहम्मद इकबाल यांनी ‘द डेली स्टार’शी बोलताना सांगितले की, सोहेल खान १८ नोव्हेंबरला शूटिंगसाठी बोगुरा येथे आले होते आणि त्यांच्या टीमसोबत ते हॉटेल मोमो इनमध्ये थांबले होते.

वाचा: 3 लग्न मोडली, वयाच्या 51व्या वर्षी लिव्ह इनमध्ये, आता चौथ्यांदा लग्न करणार राहुल महाजन?

इकबाल म्हणाले, “सोहेल खान यांनी सकाळी साडेआठ वाजता ब्रेकफास्ट केला होता आणि ते सर्वांसोबत मजामस्ती करत होते. थोड्या वेळानेच हॉटेलच्या रूममध्ये त्यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना TMSS मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.”

सोहेल खान यांना वाचवता आले नाही. त्यांनी वयाच्या ६६ वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोहेल यांच्या निधनाच्या दुःखद बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत शोक पसरला आहे. इकबाल यांनी हेही सांगितले की, बुधवारपर्यंत सोहेल खान आपला शूटिंगचा भाग पूर्ण करणार होते, मात्र मंगळवारीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. दुसरीकडे, अभिनेते शहरियार नाजिम जॉय यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातली होती. ते शूटिंगसाठी जाणार होते. मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घडना घडली.

सोहेल खान यांचा करिअर

सोहेल खान यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात ‘बांग्लालिंक’ (बांगलादेशची एक प्रमुख दूरसंचार आणि डिजिटल सेवा कंपनी)च्या एका टीव्ही कमर्शियलमधून केली होती. त्यानंतर ते कॉमेडी सीरीज ‘420’मध्ये दिसले होते. सोहेल यांनी ‘गुलाब जामुन’, ‘जंगल’, ‘फॅमिली क्राइसिस’ आणि ‘लीडर’सह अनेक लोकप्रिय फिल्म्स आणि शोमध्ये काम करून बांगलादेशात आपली खास ओळख निर्माण केली होती. शेवटच्या वेळी अभिनेत्याला स्क्रीनवर ‘आंटो नगर’ या फिल्ममध्ये पाहण्यात आले होते. आता ते ‘नसीब’मध्ये दिसणार होते.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language