Hashtagintro

Solapur Fraud Case : पेन्शन, फंडाचे आमिष दाखवून २५ लाखांची केली फसवणूक

सोलापूर : मंत्रालयातील महसूल विभागात अधिकारी असल्याचे भासवून लक्ष्मी-विष्णू मिलच्या कामगारांना घरासाठी जागा, थकीत पेन्शन आणि फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवत २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रवींद्र आणाराव कोनापुरे (रा. अशोकनगर, विजापूर रोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत आदिनाथ मुरलीधर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीने मंत्रालयात कार्यरत असल्याचे सांगून कामगारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने २० लाख रुपये आणि शेअर्ससाठी पाच लाख रुपये घेतले.

शासनाच्या नावाने बनावट पावत्या तसेच पत्रव्यवहाराच्या प्रती देऊन कामगारांची दिशाभूल केली. २० नोव्हेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कुतवळ हे करीत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language