सोलापूर : उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर अर्भकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयातच सोडून नातेवाईक निघून गेल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. या घटनेमुळे माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
शीतल सोमनाथ मोरे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांची १९ ऑक्टोबर रोजी धाराशिव येथे सामान्य प्रसूती झाली. मात्र अर्भकास श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने अर्भकासह आईला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान सोलापुरात शुक्रवारी (दि. ३०) अर्भकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्भकाचे नातेवाईक त्याचा मृतदेह रुग्णालयातच सोडून तेथून निघून गेले. मृतदेहाची जबाबदारी न स्वीकारताच नातेवाईक निघून गेल्याने रुग्णालय परिसरात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
Source: Pudhari News
