Hashtagintro

Solapur Politics : दोन्ही आमदार देशमुखांची 'चाय पे चर्चा'

रामेश्वर विभूते

सोलापूर : शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या मतदानादिवशी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी एकत्रित फिरत अनेकांच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी येत चहापानही केले.

शुक्रवारच्या मतदानाच्यादिवशी दोन्ही देशमुखांची सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास डफरीन चौकाजवळील नूतन मराठी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर भेट झाली. आमदार विजयकुमार देशमुख हे चिरंजीव डॉ. किरण आणि स्नुषा उर्वशी यांच्यासह मतदान केंद्रावर आले. मतदान करून झाल्यावर बाहेरील बुथवर आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, नगरसेवक अनंत जाधव, रंजिता चाकोते, शिवानंद पाटील, अमर पुदाले आदींसोबत उभारून सर्व माहिती घेतली. मतदारांशीही संवाद साधला.

कार्यकर्ते आणि नगरसेवकांना सावलीत बसा, उन्हाळा वाढत आहे म्हणत पाण्याची बाटलीही दिली. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्वांनाच, चला चहा घेऊ असे म्हणत, निवासस्थानी बोलावले. लगेच सर्वांनीही होकार दर्शवत चारचाकींचा ताफा काळजापूर मारूतीजवळील विजयकुमार देशमुख यांच्या घराकडे निघाला. परंतु दिवसभरात दोन्ही देशमुखांची सलगी आणि झालेली ‘चाय पे’ चर्चाचीच संपूर्ण वर्तुळात चर्चा होती.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language