Hashtagintro

Sonali Kulkarni: सोनालीचं पहिलं लग्न कोणासोबत झालेलं! घटस्फोटानंतर श्रीमंत व्यक्तीशी थाटला दुसरा संसार

Sonali Kulkarni: सोनालीचं पहिलं लग्न कोणासोबत झालेलं! घटस्फोटानंतर श्रीमंत व्यक्तीशी थाटला दुसरा संसार

Sonali Kulkarni: सेलिब्रिटी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयु्ष्यामुळे कायम चर्चेत असतात. सेलिब्रिटींचं अफेअर कोणासोबत आहे, त्यांच्या ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर कायम रंगलेल्या असतात. अनेकदा सेलिब्रिटींच्या ब्रेकअप आणि घटस्फोटाला अनेक वर्ष झालेली असताना देखील त्यांच्या नात्याची चर्चा सुरु असते. आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोनाली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज ती मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. पण अभिनेत्रीने करियरची सुरुवात साउथ सिनेमांमधून केली. पण ‘दायरा’ या हिंदी सिनेमातून तिला खरी ओळख मिळली.

सोनाली हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं आणि आजही करत आहे. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सोनाली हिचं पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आहे. सोनाली हिचं पहिलं लग्न चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत झालं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोनाली आणि चंद्रकांत यांचा घटस्फोट झाला.

पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सोनाली हिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. ज्याच्यासोबत अभिनेत्रीने दुसरा संसार थाटला. सोनाली हिने दुसरं लग्न करोडपती नचिकेत पंतवेद्य यांच्यासोबत केलं. हे भारतीय मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील एक नामांकित बिझनेस लीडर आणि एक्झिक्युटिव्ह आहेत. आज दोघे आनंदी आयुष्य जगत आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे.

सोनाली कुलकर्णी हिचं वादग्रस्त विधान

सोनाली फक्त तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळेच चर्चेत नसते, तर अभिनेत्री तिच्या परखड मतांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. एकदा अभिनेत्रीने विवाहित महिलांसाठी विचित्र वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर सोनाली हिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागलेला.

सोनाली म्हणालेली, ‘भारतीय महिला प्रचंड आळशी असतात. त्यांना फक्त असा नवरा आणि बॉयफ्रेंड हवा असतो, जो चांगले पैसे कमवतो… त्याचं घर चांगलं असेल…’, या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली होती, त्यानंतर अभिनेत्री स्वतःच्या वक्तव्यावर दिलगिरी देखील व्यक्त केली होती.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language