Hashtagintro

Sunil Tatkare: अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला हवं? बैठकीनंतर सुनील तटकरेंनी सांगितली आमदारांची भूमिका; निधीवादावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

Sunil Tatkare: अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला हवं? बैठकीनंतर सुनील तटकरेंनी सांगितली आमदारांची भूमिका; निधीवादावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

आज देवगिरीवर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बैठकीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बैठक, अर्थखात्याच्या चर्चेबाबत माहिती दिली आहे. तसेच रोहित पवारांवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. दोन-चार सदस्य हे राज्याच्या बाहेर आहे. बाकी सर्व विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य उपस्थित होते. मी स्वतः, राजेंद्र जैन, पार्थ पवार, प्रफुल पटेल उपस्थित होते. महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट आलं आहे. त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांनी दौरे सुरू करावे. जिल्ह्यात मतदारसंघात तालुक्यामध्ये चार पाच ठिकाणी भेटी द्याव्यात, असं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, नुकसानाची पाहणी करत असताना राज्य सरकारने जी काही मदत केलेली आहे त्या संदर्भात पंचनाम्यांची माहिती घेणे. त्याचा आढावा घेणे. गरज वाटल्यास त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे. असा सर्व अजेंडा नेमलेला आहे. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे दौरे सुरू होतील. आमदारांनी देखील त्यांच्या विभागामध्ये दौरे करावे. विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांना देखील काही जिल्ह्यांची जबाबदारी देणार आहे. ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जातील आणि प्रश्न समजून घेतील आणि आढावा घेतील.

सुनील तटकरेंनी सांगितलं की, तसेच एसआरएच्या अनुषंगाने बीएलएटू नेमण्याचा सुरू आहे. त्यांचा प्रभावीपणे काम करण्याचा निष्कासन त्या संघटनेच्या माध्यमातून सर्व आदेश द्यायचे आहेत. दुष्काळाच्या बाबतीत सर्व निधी त्या परिस्थिती या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या. पुढच्या काळामध्ये संघटनात्मक काळानुसार शेतकऱ्यांच्या कामांसाठी निर्णय घेण्याचा सूर त्या ठिकाणी होता. सुनेत्रा पवार यांनी देखील या संदर्भात सखोल चर्चा केली आणि त्या पद्धतीने सूचना केली.

त्यांनी सांगितलं की, अर्थखात्याबाबत विधानसभा आमदार आग्रही होते. की अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे देण्यात यावं. ज्यावेळी आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये गेलो आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज सुरू केलं. त्यामध्ये अजित पवार यांच्याकडे खातं होतं. त्या अनुषंगाने पुन्हा हे राष्ट्रवादी मिळावं अशी मागणी अजून आहे, असं तटकरे म्हणाले आहेत.

सुनील तटकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी आपला चेहरा बघावा. अजितदादा गेल्यानंतर त्यांचे वक्तव्ये तपासून पहावी. त्यानंतर त्यांचा आणि इतर लोकांचा खरा खोटा चेहरा लक्षात येईल. त्यांना टीका करता येतात. प्रत्येकाचा आपला निर्णय असतो. भूमिका घेत असताना त्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात त्यांची भूमिका काय हे लक्षात येतं, असं त्यांनी सांगितलं आहे.

निधी वादावर बोलताना ते म्हणाले की, आमदार शेवटी लोकांच्या मधून निवडून येत असतात. त्यावेळी लोकांच्या समोर कामाचा आराखडा ठेवलेला असतो. आता ते निधी मिळण्याचा दृष्टीतून आमदारांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. तसेच सरकारमध्ये काम करत असताना विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी असते. आमदारांना पुढच्या काळामध्ये निधी कसा मिळेल या संदर्भात आम्ही काम करू. विशेष कोणी कोणाबद्दल काही नाव घेऊन बोललो नाही. परंतु प्रत्येकाच्या व्यथा हा त्यांच्या मतदारसंघातील होत्या. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. राष्ट्रवादी म्हणून आम्ही काम करत आहोत. शिवसेना म्हणून ते काम करत आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. पण प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघांमध्ये निधी मिळावा ही त्यांची मागणी असते.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language