Hashtagintro

Suraj Chavan Daughter: सुरज चव्हाणच्या लेकीला पाहिलेत का? पहिली झलक आली समोर

Suraj Chavan Daughter: सुरज चव्हाणच्या लेकीला पाहिलेत का? पहिली झलक आली समोर

साधा सरळ स्वभाव, बोलण्याची शैली या सगळ्यामुळे बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या विषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी सूरज बाबा झाला. त्याच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता सूरजने या चिमुकल्या गुलिगत स्टारचे घरी स्वागत केले आहे. तिच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या लेकीची पहिली झलक समोर आली आहे.

सूरज चव्हाण आणि संजय यांच्या घरी कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी मुलगी राधा आला. सूरजने सोशल मीडियावर ‘घरी राधा आली आहे’ असेच म्हणत आनंदाची बातमी दिली होती. त्याने जेव्हा लेकीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो भावूक झाला. त्याने पत्नीला घट्ट मिठी मारली होती. त्यानंतर आता सूरजने सोशल मीडियावर लेकीचे घरी स्वागत केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने मोठ्या थाटामाटात लेकीला घरी आणले आहे.

सूरजने शेअर केला लेकीचा व्हिडीओ

सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लेकीचे घरात स्वागत करताना दिसत आहे. सगळीकडे फुलांची सजावट, बेडच्या वर लेकीचे स्वागत असे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये सूरजने मध्ये मध्ये लेकीची झलक दाखवली आहे. हा व्हिडीओ शेअर करत सूरजने ‘माझी लाडाची लक्ष्मी आली सोन पावली’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर सूरजा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने तुझं जग बदलताना पाहिलयं सूरज… याहून सुंदर गोष्ट कोणतीच नाही अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, सुरजच्या घरी पोरीच्या रूपात साक्षात लक्ष्मी आली असे म्हटले आहे. बाकी लोकांनी त्याच्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language