Hashtagintro

Thane News: ठाणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय! जिल्ह्यामध्ये रॉकेटसह हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी

ठाणे: ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी घडलेल्या आगीच्या दुर्घटनांमुळे जीविताला होणारी हाणी लक्षात घेता, ठाणे जिल्हा प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी फटाक्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने आपल्या हद्दीत पुढील काही दिवस रॉकेटसह हवेमध्ये उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नागरिकांचा चांगलाच हिरमोड झालेला पाहायला मिळाला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/09/major-fire-breaks-out-at-raheja-garden-complex-in-thane-deputy-chief-minister-eknath-shinde-arrives-at-the-scene-rescue-operations-underway/
ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये, रॉकेटसह हवेमध्ये उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर 9 नोव्हेंबर 2026 पासून 8 जानेवारी 2027 पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा महत्त्वाचा निर्णय, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी फटाक्यांवर बंदी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 या कायदान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. हा निर्णय ठाण्यासह नवी मुंबई आणि मुंबई शहरातही लागू करण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/government-schemes-for-tribal-communities-tribal-people-to-receive-immediate-benefits-under-one-roof-a-mega-event-for-government-schemes-to-be-held-in-the-presence-of-judges/
लक्ष्मीपूजनच्या दिवशी कल्याणसह ठाणे शहरातही काही ठिकाणी रॉकेट घरामध्ये घुसून आगीची दुर्घटना घडली होती. ही घटना लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रॉकेटसह हवेमध्ये उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. सलग दोन महिने शहरामध्ये बंदी घातल्यामुळे काहीसा नागरिकांकडून दिलासा व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक- खासगी मालमत्तेचे प्रचंड नुकसान आणि मानवी जीवितासही धोका होत असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घालण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रतिबंधात्मक आदेश, 9 नोव्हेंबर 2026 च्या मध्यरात्री 12.01 वाजेपासून ते 08 जानेवारी 2027 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/husband-murders-wife-over-suspicions-about-her-character-ends-his-own-life-by-jumping-in-front-of-a-local-train-at-grant-road-station/
सार्वजनिक रस्ते, मैदान, घराच्याबाहेर, इमारतींच्या किंवा घराच्या टॅरेसवर, बाल्कनीमध्ये किंवा सोसायटीच्या बाहेर अशा वेगवेगळ्या परिसरांमध्ये नागरिकांना रॉकेटसह हवेमध्ये उडणारे फटाके वाजवण्यास निर्बंध आहेत. इतरत्र फटाक्यांवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लावलेले नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 आणि 60 अन्वये कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकहो, स्वत:सह इतरांच्याही सुरक्षिततेसाठी आदेशाचे काटेकोर पालन करत संकटापासून दूर राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने केले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language