Hashtagintro

Tilak Varma : तिलक वर्माची कमाल! एका वर्षात 26 कॅचेस, T20 क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

Tilak Varma :  तिलक वर्माची कमाल! एका वर्षात 26 कॅचेस, T20 क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात तिलक वर्माने दोन झेल पकडून इतिहास रचला. हे दोन झेल पकडत त्याने एकाच कॅलेंडर वर्षात फील्डर (क्षेत्ररक्षक) म्हणून सर्वाधिक कॅचेस टिपण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. तिलकने सामन्याच्या दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर पहिला झेल टिपला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर टीम सायफर्टला ऑन साइडच्या दिशेने मोठा फटका मारायचा होता; मात्र त्याला चेंडूवर योग्य प्रकारे बॅट लावता आली नाही. यावेळी तिलक वर्माने शानदार कॅच पकडत सायफर्टला अवघ्या 7 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर पुढच्याच षटकात तिलकने डॅरेल मिचेलचाही झेल पकडला. भुवनेश्वर कुमारच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मिचेलने कव्हर्सच्या दिशेने फटका मारला; मात्र तिथे फिल्डींग करणाऱ्या तिलकने झेल टिपला. त्यामुळे मिचेलला 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

तिलक वर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड

त्याच्या या खास कामगिरीमुळे, तिलक वर्मा हा आता एका कॅलेंडर वर्षात म्हणजेच एका वर्षात फिल्डर म्हणून, सर्वाधिक 26 झेल पकडणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंडोनेशियाच्या डॅनिलसन हावोच्या नावावर होता. त्याने 2025 मध्ये 25 झेल पकडले होते. तर यूएईच्या मोहम्मद वसीमने 2024 मध्ये 24 झेल टिपले होते.

T20Is मध्ये एका कॅलेंडर वर्षात फिल्डर म्हणून पकडलेले सर्वाधिक कॅच

26 – तिलक वर्मा (IND) 2026 मध्ये

25 – डॅनिलसन हावो (इंडोनेशिया) 2025 मध्ये

24 – मोहम्मद वसीम (UAE) 2024 मध्ये

21 – शर्विन मुनियांडी (मलेशिया) 2025 मध्ये

20 – ब्रायन मसाबा (युगांडा) 2023 मध्ये

20 – तंजीद हसन (BAN) 2025 मध्ये

भुवनेश्वर कुमारने 1434 दिवसांनंतर घेतली विकेट

दरम्यान, तब्बल 4 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला पहिली विकेट मिळवण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचं संघात पुनरागमन झालं खरं, मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्याने त्याला बॉलिंग करण्याची संधीच मिळाली नाही. तर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याला गोलंदाजीची संधी मिळाली, पण त्याची चांगलीच धुलाई झाली. चार ओव्हर्सच्या कोट्यात या अनुभवी गोलंदाजाने 49 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मात्र दुसऱ्या टी-20 मध्ये अखेर त्याला यश मिळालं. भुवीने 1434 दिवसांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विकेट घेतली.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language