अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईची सध्या चर्चा सुरू आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही यावर भाष्य करत मुंढेंच्या कामाचं कौतुक केलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेच्या निकषांचं पालन न करणाऱ्या अनेक रेस्टॉरंटवर धडक कारवाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनाक्षी सिन्हाने पॉडकास्टमध्ये तिला माहिती असलेल्या रेस्टॉरंट्सचा उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचं समर्थन करत त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांची नियुक्ती ही अलीकडच्या काळातील सर्वोत्तम गोष्ट असल्याचं मत तिने व्यक्त केलं.
सोनाक्षी सिन्हा तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या रेस्टॉरंट्सबद्दल बोलत असताना तिचा पती झहीर इक्बालनेही आपलं मत मांडलं. संबंधित ठिकाणी स्वच्छता होती, मात्र पदार्थांमध्ये लाल रंगाचा वापर जास्त असल्याचं त्याने नमूद केलं.
‘Untriggered Podcast’मध्ये सोनाक्षी सिन्हाने तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं. ती म्हणाली, “आता आपल्याकडे तुकाराम मुंढे आहेत. मला वाटतं, गेल्या बऱ्याच काळात मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात घडलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे.”
Source: TV9 Marathi Entertainment





