Hashtagintro

U19 Asia Cup 2026 Final : वेदनेने विव्हळत असूनही ज्यूनियर सेहवाग फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याच तडफेने खेळला, पठ्ठ्याने मैदान नाही सोडलं, 9 फोर अन्..

U19 Asia Cup 2026 Final : वेदनेने विव्हळत असूनही ज्यूनियर सेहवाग फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याच तडफेने खेळला, पठ्ठ्याने मैदान नाही सोडलं, 9 फोर अन्..

आशिया कप अंडर 19 टुर्नामेंटमध्ये सुरुवातीपासून दमदार फलंदाजी करणाऱ्या आर्यवीर सेहवागने फायनलमध्ये सुद्धा तशीच खेळी केली. आज भारत-पाकिस्तान फायनल सुरु आहे. टीम इंडियाकडून ज्यूनियर सेहवाने अर्धशतकी खेळी केली. त्याने 51 चेंडूत 50 धावा केल्या. नेहमीपेक्षा आर्यवीर स्लो खेळला. या मागचं कारण त्याला झालेली दुखापत आहे. पाचव्या ओव्हरमध्ये आर्यवीर सेहवागच्या हाताला बॉल लागला. त्यानंतर वेदना होत असूनही तो खेळला. अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. उस्माम खानच्या शतकाच्या बळावर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 337 धावा केल्या. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यवीर आणि कॅप्टन लक्ष्य रायचंदानी यांनी दमदार सुरुवात केली.

भारतीय टीमचा ओपनर आर्यवीर सेहवाग चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये भारताकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. टुर्नामेंटमध्ये चौथ्यांदा त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने एक शतकही या टुर्नामेंटमध्ये झळकवलं. नेपाळ विरुद्ध 70 धावांची खेळी केली. त्यानंतर यूएई विरुद्ध 160 धावा केल्या. अफगाणिस्तान विरुद्ध सेमीफायनलमध्ये 51 धावा केल्या.

मुमीन लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर

आर्यवीर टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आहे. आर्यवीरने पाच सामन्यात 90.25 च्या सरासरीने 361 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा प्लेयर तो आहे. दुसऱ्या नंबरवर या लिस्ट मध्ये पाकिस्तानचा उस्मान खान आहे. त्याने शनिवारी फायनलमध्ये भारताविरुद्ध शानदार शतक झळकावलं. त्याने पाच मॅचमध्ये 345 धावा केल्या आहेत. या टुर्नामेंटमध्ये त्याने दोन शतकं झळकवली आहेत. बांग्लादेशचा मुमीन लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. त्याने 4 सामन्यात 235 धावा केल्या आहेत.

त्यानंतर तो जास्त वेळ क्रिजवर राहिला नाही

आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्यने भारतीय टीमला चांगली सुरुवात करुन दिली. पण पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आर्यवीरला दुखापत झाली. चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यामुळे तो वेदनेने विव्हळत होता. फिजियोने ट्रिटमेंट दिल्यानंतर वेदना थोड्या कमी झाल्या. त्यानंतरच्या षटकांमध्ये फटके खेळताना त्याला अडचण येत होती. मात्र, तरीही तो विकेटवर टिकून राहिला. 15 व्या ओव्हरमध्ये त्याने आपली हाफ सेंच्युरी झळकवली. त्यानंतर तो जास्त वेळ क्रिजवर राहिला नाही. आर्यवीरने 61 चेंडूत 58 धावा केल्या. या इनिंगमध्ये 9 चौकार मारले.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language