Hashtagintro

Uday Samant | रत्नागिरीत लवकरच मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अकॅडमी सुरू होणार

कुडाळ : आज सर्वात जास्त गोडवा असलेली कोणती बोलीभाषा असेल तर ती ‘मालवणी बोलीभाषा’ आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी भाषा कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून, त्यात मालवणी बोलीभाषेवर रिसर्च केले जाईल. मालवणी बोलीभाषेचा शब्दकोश तयार करण्याचे आपले प्रयत्न आहेत. जेणेकरून पुढील पिढीला याची माहिती मिळेल. तसेच रत्नागिरीत लवकरच मोफत एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अकॅडमी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित ‘केपीएल अश्वमेध-२०२५’ गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language