Hashtagintro

Ur Trending In My Heart : आठवड्याभरात ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ तुफान हिट, जेन झी प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद

Ur Trending In My Heart : आठवड्याभरात ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ तुफान हिट, जेन झी प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद

सध्या सोशल मीडियावर एखादं गाणं लोकप्रिय होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. एखादी हटके संकल्पना, आकर्षक शब्द आणि आजच्या तरुणाईशी जोडली जाणारी भावना असेल, तर ते गाणं काही दिवसांतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकतं. याचाच प्रत्यय सध्या ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या नव्या गाण्याच्या लोकप्रियतेतून येत आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात या गाण्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, विशेषतः जेन झी तरुणाईकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट‘ या गाण्याला आठवड्याभारत इन्स्टाग्राम आणि युट्युब मिळून 5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट‘ गाण्याची क्रेझ

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा तरुणाईच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. ट्रेंडिंग, रील्स, लाइक्स आणि व्हायरल होणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचा प्रभाव तरुणांच्या दैनंदिन जगण्यावर दिसून येतो. याच डिजिटल विश्वाची भाषा आणि प्रेमाची भावना यांची सांगड ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्यात घालण्यात आली आहे. त्यामुळे हे गाणं तरुणाईला विशेष भावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नाव आणि त्यामागची संकल्पना. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीनं वापरलेल्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या भाषेचा अनोखा वापर यात करण्यात आला आहे.

टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी या गाण्याचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलंय. उमेश कुमावत हे पत्रकारिता क्षेत्रातील मोठं नाव आहे. त्यांचं हे दुसरं गाणं असून याआधी त्यांनी ‘थक गया मै साला’ या गाण्याचं लिखाण, गायन केलेलं आहे. त्यांच्या नव्या ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kumawat (@umeshk73)

दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी सुचलेली या गाण्याची कल्पना आजच्या जेन झीच्या आवडीशी जुळणारी ठरतेय. त्यामुळे यंदाच्या न्यू इयर पार्टीच्या प्लेलिस्टमध्ये ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्याला आवर्जून स्थान मिळणार, यात काही शंका नाही. अवघ्या सात दिवसांत चर्चेत आलेल्या या गाण्यानं जेन झींच्या संगीतविश्वात आपली जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language