वंदे भारत ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये या ट्रेनमधून प्रवास करण्याची जबरदस्त क्रेझ आहे. स्वदेशी बनावटीची ही ट्रेन आणखी सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. असं असताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याने मोठं विधान केलं आहे. (Photo: @RailMinIndia Twitter)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत पुढील तीन ते चार वर्षांत संपूर्ण वंदे भारत गाड्यांची निर्यात सुरू करेल. भारतीय रेल्वे आपल्या स्वदेशी ट्रेन सेटमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. इतकंच काय तर प्रोपल्शन सिस्टीम व बोगी यांसारख्या काही भागांची स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि अमेरिकेला निर्यात करण्यास आधीच सुरुवात केली आहे. (Photo: @RailMinIndia Twitter)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, “वंदे भारत रेल्वेगाडीच्या प्रत्येक आवृत्तीसोबत आम्ही सुधारणा करत आहोत. प्रत्येक वेळी नवीन आवृत्ती बनवताना आम्ही मागील आवृत्तीतून शिकलेल्या गोष्टींवर आधारित रचना करतो.” (Photo: @RailMinIndia Twitter)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारतच्या स्लीपर आवृत्तीमध्ये मधल्या आणि वरच्या बर्थचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा आहेत. तसेच धक्के कमी करून आराम वाढवण्यासाठी प्रगत कपलरची रचना करण्यात आली आहे. (Photo: ANI)
बंगळूरु-मुंबई वंदे भारत नियमित सेवा 2 नोव्हेंबर रोजी मुंबईहून आणि 3 नोव्हेंबर रोजी बंगळूरुहून सुरू होत आहे. बंगळुरु-मुंबई ट्रेन सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. ही ट्रेन सायंकाळी 7:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 वाजता पोहोचेल. परतीची ट्रेन मंगळवार वगळता मुंबईहून रात्री 8:10 वाजता सुटेल आणि बंगळुरुला दुपारी 12 वाजता पोहोचेल. (Photo: ANI)
Source: Prahaar News