Hashtagintro

Video : काही सेकंदांचा थरार बेतला असता जीवावर; फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर धरून पेटवला अन्…

Video : काही सेकंदांचा थरार बेतला असता जीवावर; फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर धरून पेटवला अन्…

दिवाळी म्हटलं की फटाके फोडण्याचा उत्साह काही वेगळाच असतो. पण काही लोकांना उत्साह दाखवण्याच्या नादात आपण काय करतोय, याचंही भान राहत नाही. सोशल मीडियावर उत्साह सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेने चक्क फटाक्यांटा बॉक्स हातात धरला आणि त्याला आग लावल्यानंतर तो थेट डोक्याच्या वर उचलला. पुढे जे घडलं ते पाहून कोणाचाही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

फटाक्यांचा बॉक्स हातात घेतला अन् सुरू झाली आतीषबाजी

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला घराच्या गच्चीवर उभी असल्याचं दिसतं.तिच्या हातात फटाक्यांनी भरलेला एक बॉक्स दिसत आहे. तेवढ्यात एक मुलगा तिच्याजवळ येतो आणि त्या बॉक्समध्येच आग लावतो. आता आग लावल्यावर महिलेने तो बॉक्स खाली ठेवण्यऐवजी डोक्यावर धरला आणि अतिषबाजी सुरू झाली. हे दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. आकाशात उंच उडणारे फटाके एकामागोमाग उडून फुटू लागले.सुरूवातीला ती महिला तो बॉक्स तसाच घेऊन उभी होती. पण जसं जसं आगीच्या ज्वाळा वाढू लागल्या तसा संपूर्ण बॉक्सने पेट घेतला. ती महिला घाबरली तो बॉक्स गच्चीवर फेकला आणि तिथून पळाली.

 

 

 

नेटकऱ्यांचा संताप

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला. काही क्षणातंच तो व्हायरल झाला. त्यानंतप अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला.काही नेटकऱ्यांनी स्व:च्या जीवाशी असा खेळ करणं धोकादायक असल्याचं सांगितलं. तर काहींनी अशा धोकदायक प्रकारावर कारवाई करण्याची मागणी केली.

काही सेंकदाचा थरार जीवावर बेतू शकतो

फटाके पेटवताना सुरक्षित अंतर ठेवणं किती महत्त्वाचं आहे. हे या व्हिडिओमुळे कळत आहे.जर त्या बॉक्समधील फटाक्यांचा एकदम भडका उडाला असता तर आग सहजपणे सगळीकडे पसरली असती.त्या महिलेला इजा झाली असती. मात्र काही क्षणांच्या उत्साहासाठी स्वत:जीव धोक्यात घालण्याची ही कृती पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language