Hashtagintro

Video Viral : इमारतीला 4 लिफ्ट, तरी मजुराला 21 व्या मजल्यापर्यंत डोक्यावरून….क्रूरता पाहून येईल प्रचंड संताप

Video Viral : इमारतीला 4 लिफ्ट, तरी मजुराला 21 व्या मजल्यापर्यंत डोक्यावरून….क्रूरता पाहून येईल प्रचंड संताप

मोठ मोठ्या इमारती बांधल्या जातात. त्यात राहण्याऱ्यांसाठी लिफ्ट, पार्किंग आणि अनेक सुविधा असतात. पण ज्या मजूरांच्या घामातून या इमारती बांधल्या जातात. त्यांच्या त्या पासून दूर ठेवलं जातं. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मजूर डोक्यांवर विटांचा भार घेत 21 मजले चढून जात आहेत. विशेष म्हणजे त्या इमारतीत 4 लिफ्ट असूनही मजूरांना असे राबवल्यामुळे सोशल मीडियावर द्वारे संताप व्यक्त केला जातं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मजूर डोक्यावर विटा ठेवून इमारतीच्या जिन्याने वर जाताना दिसतो. त्याच्या डोक्यावर साधारण 20 किलो वजनाच्या विटा असल्याचं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये पायऱ्या चढताना त्याला डोक्यावरचा भार सांभाळावा लागतोय. त्यात लागणारी धाप, म्हणजे एखाद्याने किती हाल सोसावे.

हा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने इमारतीत 4 लिफ्ट असल्याचं सांगितलं आहे. मात्र मजूरांना लिफ्ट वापरण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं आहे. पण मजुरांना अशा प्रकारे विटा न्यायला सांगायच्याच का? सामानासाठी सर्विस लिफ्ट, निर्माण सामग्री उचलणारी मशीन याचा वापर करता येतो की. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र ही इमारत नक्की कुठे आहे? हा व्हिडिओ नक्की कुठला आहे? याची माहिती स्पष्ट झालेली नाही.

 

 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी मजूरांच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 4 लिफ्ट असलेल्या इमारतीत काम करणाऱ्या मजूरांना साधी लिफ्ट वापरता येत नसेल तर ही कसली व्यवस्था. तर दुसऱ्याने म्हटलंय की माणूसकी आता राहिलेली नाही. तर काहींनी इमारत बांधणाऱ्या कामगारांनाच अशा प्रकारे वागणूक मिळणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मजुरांना लिफ्ट वापरण्यास परवानगी नसल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला असला तरी इमारतीच्या व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती, प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या व्हिडिओमुळे मजुरांची मेहनत, त्यांची सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शहरातील उंच इमारती उभ्या करणाऱ्या हातांनाही सन्मान आणि सुरक्षित कामाची परिस्थिती मिळायला हवी.अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language