Hashtagintro

Vijayadashami 2026: दसऱ्याचा सण, विजयाचा संकल्प; राष्ट्रपती आणि पंतप्रधान काय म्हणाले?

नवी दिल्ली: आज देशभरात विजयादशमीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. या मंगल प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र सणानिमित्त दोन्ही नेत्यांनी देशवासीयांचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने उजळून निघो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर चालत एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

प्रभू श्रीरामांचे आदर्श आणि राष्ट्राचा संकल्प
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीराम हे धर्म आणि नैतिक आचरणाचे साक्षात स्वरूप मानले जातात. भारतीय संस्कृती नैतिकता आणि कर्तव्याच्या मूल्यांवर उभी आहे. त्यामुळे हा सण साजरा करताना प्रत्येक नागरिकाने आपल्या समृद्ध वारशाचे पालन करत विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान देण्याचा संकल्प करायला हवा. राष्ट्रपतींनी देशवासीयांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/20/give-the-finance-portfolio-to-the-ncp-before-the-winter-session/
उत्साह आणि विश्वासाचे पर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, उत्साह आणि विश्वासाचा हा विजयपर्व प्रत्येकाच्या संकल्पाला नवी ऊर्जा आणि शक्ती प्रदान करो. विजयादशमीचा हा सण केवळ रावदहनापुरता मर्यादित नसून तो आपल्या आतील वाईटाचा नाश करून चांगुलपणाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा देतो. या पवित्र दिवशी प्रत्येकाचे जीवन सुख, सौभाग्य आणि यशाने समृद्ध होवो, अशी मंगलकामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language