
टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएस्काथे यांनी विराट कोहलीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कोहलीच्या फलंदाजीतील एक तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना किती काळजी घ्यावी लागली, याचे वर्णन त्यांनी केले. त्यांच्या मते, त्या दौऱ्यात ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करताना कोहली वारंवार बाद होत होता.
त्याच्या वारंवार बाद होण्याने चर्चेला सुरुवात झाली. ज्यामुळे प्रशिक्षक मंडळ या समस्येकडे लक्ष देत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. रायन टेन डोशेट यांनी स्पष्ट केले की, विराट कोहलीसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला तांत्रिक सल्ला देणे सोपे नाही. अशा दर्जाच्या खेळाडूला तांत्रिक सल्ला देण्यास प्रशिक्षकसुद्धा घाबरतात. योग्य गोष्ट सांगण्यासाठी दुसऱ्याच्या मताला घाबरणारा प्रशिक्षक मला कधीच व्हायचे नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या चौथ्या कसोटीदरम्यान मी त्याच्याशी बोलायला गेलो होतो. विशेष गोष्ट ही आहे की, त्या त्रुटीबद्दल कोणीतरी त्याच्याशी बोलावे अशी विराटची खरोखरच इच्छा होती.
मात्र डेस्काथे यांनी हे मान्य केले की, कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूशी असा संवाद सुरू करणे हे एक नाजूक काम असू शकते. प्रशिक्षकांनी केवळ त्यांना काय म्हणायचे आहे याचाच विचार करू नये, तर तो संदेश कसा आणि केव्हा द्यायचा याचाही विचार करावा. त्यांच्या मते, एखाद्या प्रशिक्षकाने विराट कोहलीसारख्या खेळाडूकडे जाऊन हस्तक्षेप करणे आणि त्याला नेमके काय चालले आहे हे सांगणे, हे धोकादायक ठरू शकते. यासाठी योग्य शब्दांची निवड आणि संदेश देण्याची पद्धत अत्यंत महत्त्वाची असते.
विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरू शकतो. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 22 धावांची गरज आहे. कोहलीने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 38 एकदिवसीय सामने खेळले असून, त्यात 56.51 च्या सरासरीने 1,978 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 7 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज पाँटिंगने 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 45.83 च्या सरासरीने 1,971 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिनने न्यूझीलंडविरुद्ध 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46.05 च्या सरासरीने 1,750 धावा केल्या आहेत.
Source: TV9 Marathi Sports
